Ruturaj Gaikwad: डेब्यूमध्ये '0' आणि पुढच्या सिझनमध्ये...; कोण आहे CSK चा नवा कर्णधार

Ruturaj Gaikwad: आजपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात मोठा बदल घडला. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाची धुरा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. 

| Mar 22, 2024, 07:10 AM IST
1/7

आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धचा पहिला सामना एका नव्या युगाची सुरुवात असणार आहे. आता कमान महेंद्रसिंग धोनीऐवजी ऋतुराज गायकवाडच्या हातात असणार आहे.

2/7

ऋतुराज गायकवाडचा जन्म 31 जानेवारी 1997 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. गायकवाड यांचे वडील दशरथ गायकवाड हे DRDO मध्ये काम करत होते आणि त्याची आई शिक्षिका होती. 

3/7

ऋतुराजने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी 2016-17 रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि फेब्रुवारी 2017 मध्ये, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केलं.

4/7

2019 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गायकवाडला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये विकत घेतलं. परंतु संपूर्ण सिझनमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. 

5/7

आयपीएल 2020 मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि डेब्यूचा सामन्यात तो शून्यावर बाद झाला. गायकवाडने त्या सिझनमध्ये सहा सामने खेळले आणि चार डावात तीन अर्धशतकांसह एकूण 204 रन्स केले. 

6/7

ऋतुराज 2021 IPL मध्ये सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरला. गायकवाडने 16 डावात 136.26 च्या स्ट्राईक रेटने एकूण 635 रन्स केले होते. यादरम्यान त्याने चार अर्धशतके आणि एक शतक झळकावलं होते. याशिवाय ऑरेंज कॅप जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. परंतु नंतर शुभमन गिलने हा विक्रम आपल्या नावे केला. 

7/7

आयपीएल 2021 मधील त्याची दमदार कामगिरी पाहून चेन्नईने त्याला आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी 6 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आणि त्यानंतर चेन्नईने ऋतुराजला आयपीएल 2023 मध्येही कायम ठेवले.