'या' अभिनेत्याने प्रेग्नेंट नीना गुप्ता यांना म्हटलं, तुझ्या मुलीला माझं नाव देतो, लग्न कर...

Entertainment News : या अभिनेत्याने प्रेग्नेंट नीना गुप्ता लग्नाची मागणी घातली होती. तुझ्या मुलीला माझं नाव दे असं म्हटलं होतं. तर या अभिनेत्याच्या आयुष्यातील  काही सत्य जाणून मन हेलावून जाते.

Apr 13, 2024, 11:35 AM IST
1/7

आजही असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे आज आपल्यासोबत नाही, पण त्यांच्या अभिनयाने ते आपल्या मनात अजरामर आहेत. या फोटोमधील कलाकाराने त्याच्या विनोदाने आपल्याला हसवलं. तो जेवढा चांगला अभिनय करायचा एवढ्याच चांगला तो माणूस होतो. 

2/7

अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड यांच्या नात्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. नीना या लग्न न करता आपल्या मुलीला जन्म देणार होत्या. त्यावेळी या अभिनेत्याने त्यांना लग्नाची मागणी घातली होती. पण नीना यांनी नकार दिला. 

3/7

आम्ही बोलत आहोत सतीश कौशक यांच्याबद्दल. आज त्यांच्या जन्मदिवस आहे. 9 मार्च 2023 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

4/7

त्यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनही केलं. त्यांच्या चित्रपटातून तीन अभिनेते सुपरस्टार झाले. 'तेरे नाम' मधून सलमान खान आणि 'हम आपके दिल में रहते हैं' चित्रपटातून अनिल कपूर यांना वेगळी ओळख मिळाली. तर गोविंदासोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. 

5/7

सतिश कौशक यांच्या पश्चात एक मुलगी आणि पत्नी आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यातून त्यांना सावरायला बरीच वर्षे लागली होती. 

6/7

सतिश कौशक यांनी एकदा आत्महत्येचा विचार केला होता. 'रूप की रानी चोरों का राजा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यावेळी त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता. 

7/7

सतीश कौशिक यांच्या आदरांजली कार्यक्रमात त्यांच्या मुलीने वंशिकाने वडिलांना लिहिलं पत्र वाचून दाखवलं होतं. ते ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.