Tea And toast : दररोज चहासोबत टोस्ट आवडीने खाताय?; तर आत्ताच थांबवा, त्यामुळे होतातय गंभीर आजार

बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहासोबत अनेकांना टोस्ट खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि टोस्टच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो? चहासोबत टोस्टचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. टोस्टमध्ये असलेल्या घटकांबद्दल सांगायचे तर ते रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन आणि काही खाद्य पदार्थांपासून बनविलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. चला जाणून घेऊया टोस्ट खाण्याचे काय तोटे आहेत.

Jan 17, 2023, 16:44 PM IST
1/5

टोस्टमुळे आतड्यांमधील खराब बॅक्टेरियाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते. तसेच टोस्ट खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन होऊ शकते. 

2/5

टोस्टमध्ये असलेले मैदा, तेल आणि साखर यासारख्या गोष्टी हृदयासाठी हानिकारक असतात. या गोष्टी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत टोस्ट हार्ट अटॅकचे कारण बनू शकतो. हृदयरोग्यांनी अशा गोष्टी खाणे टाळावे. 

3/5

चहासोबत टोस्ट खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. त्यात भरपूर साखर असते. टोस्ट आणि चहा एकत्र खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी टोस्ट खाणे टाळावे.

4/5

पीठ आणि तेलापासून बनवलेल्या टोस्टसारख्या गोष्टी वजन वाढवतात. यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते. चहासोबत टोस्ट खाल्ल्याने वजन वाढू शकते. अशी चरबी कमी करणे खूप कठीण आहे. 

5/5

टोस्ट खाल्ल्याने शरीरात अशक्तपणा येतो. तसेच पोट भरल्यासारख्य वाटत पण तसे होत नाही. टोस्टमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते, त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते आणि शरीर कमकुवत होते. टोस्ट खाल्ल्याने मुले कुपोषित होऊ शकतात.