गोल्डन बॉयची कमाल! ऑलिम्पिकआधी नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी

Neeraj Chopra Gold Medal : भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताचं नाव जगभरात उज्ज्वल केलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेआधी नीरज चोप्राने कमाल केली आहे. फेडरेशन कप 2024 स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी केली आहे. 

| May 15, 2024, 22:04 PM IST
1/7

पॅरिस ऑलिम्पिक 2024 आधी गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा कमाल केली आहे. फेडरेशन कप 2024 मध्ये पुरुषांच्या भाल फेक स्पर्धेत नीरज चोप्राने पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केली आहे.

2/7

भुवनेश्वरमधल्या कलिंगा स्टेडिअमध्ये तब्बल तीन वर्षांनी नीरज चोप्रा खेळण्यासाठी उतरला. त्याने 82.27 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं. 

3/7

2021 पासून फेडरेशन कप स्पर्धेत नीरज चोप्राची बादशाहत कायम आहे. 2021 मध्ये नीरज चोप्राने  87.80 मीटर भाला फेकत विक्रम रचला होता. 

4/7

नुकतीच दोहात झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने दुसरं स्थान पटकावलं होतं. या स्पर्धेत नीरजने 88.36 मीटर भाला फेकण्याची कमाल केली होती.

5/7

भाला फेकीत नीरज चोप्राचा राष्ट्रीय विक्रम 89.94 इतका आहे. तर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेतला विक्रम 90 मीटरचा आहे. हा विक्रम मोडण्याचा नीरज चोप्राचा मानस आहे.

6/7

टोकिया ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने 87.58 मीटर भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. भारताला एथलेटिक्समध्ये याआधी एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नव्हतं.

7/7

टोकियो ऑलिम्पिकनंतर हंगेरीतल्या बुडापेस्ट इथं झालेल्या वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत इतिहास रचला होता. नीरजने अंतिम फेरीत 88.17 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक पटकावलं