टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा रचणार इतिहास, ठरणार पहिला भारतीय खेळाडू

T20 World Cup Team India : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं मिशन वर्ल्ड कप 5 जूनपासून सुरु होईल. टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम जमा होणार आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. 

| May 07, 2024, 19:11 PM IST
1/7

टी20 वर्ल्ड कप 2024 ला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केलीय. तर चार खेळाडूंना राखीव ठेवण्यात आलं आहे. 

2/7

टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय.

3/7

रोहित शर्मा तब्बल नवव्यांदा टीम इंडियाच्या जर्सीत टी20 वर्ल्ड कप खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे हा नववाच टी20 वर्ल्ड कप आहे. म्हणजे रोहित शर्मा आतापर्यंत झालेल्या सर्व टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे.

4/7

टी20 वर्ल्ड कप पहिल्यांदा 2007 मध्ये खेळला गेला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्याच टी20 वर्ल्ड कपमध्ये जेतेपद पटकावलं होतं. विजेत्या टीम इंडियात रोहित शर्माही होता.

5/7

त्यानंतर रोहित शर्मा टी20 वर्ल्ड कप 2009, टी20 वर्ल्ड कप 2010, टी20 वर्ल्ड कप 2012, टी20 वर्ल्ड 2014, टी20 वर्ल्ड कप 2021 आणि टी20 वर्ल्ड कप 2022 मध्येही खेळला आहे. म्हणजे रोहित आतापर्यंत 8 टी20 वर्ल्ड कप खेळलाय.

6/7

टी20 वर्ल्ड कप 2024 ही रोहित शर्माची नववी स्पर्धा असणार आहे. आणि यात रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. 

7/7

भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 9 जूनला टीम इंडिया पाकिस्तानशी दोन हात करेल. टीम इंडियाचे सर्व सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडिअमध्ये खेळले जाणार आहेत.