PHOTO : मिस इंडिया, बॉलिवूड ते अध्यात्मिक प्रवास, नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांनंतर उद्ध्वस्त झालं करिअर

Entertainment :  2004 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटाने वाह वाह मिळवली होती. बॉलिवूड दुनियामध्ये बराच काळ घालवल्यानंतर हिने अचानक अध्यात्माच्या मार्ग निवडला होता. 

Mar 19, 2024, 12:11 PM IST
1/7

पहिल्या चित्रपटातून तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केल्यानंतर  ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरील आरोपांनंतर या अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त झालं होतं. 

2/7

आज 19 मार्च 1984 मध्ये झारखंडमधील जमशेदपूरमध्ये बंगाली कुटुंबात जन्मलेली ही अभिनेत्री फक्त 12 चित्रपटात झळकली होती. 

3/7

'अपार्टमेंट' या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. आम्ही कोणाबद्दल बोलतोय समजलं का तुम्हाला. आम्ही बोलतोय तनुश्री दत्ताबद्दल. 

4/7

2005 मध्ये इमरान हाश्मी आणि सोनू सूद यांच्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून तनुश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

5/7

2009 मधील 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटात आयटम साँगमध्ये झळकली होती. यावेळी अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर  MeToo चा आरोप केला होता. यामुळे ती खूप दिवस चर्चेत आली होती. 

6/7

या घटनेनंतर तिने बॉलिवूडचं जग सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला. तिने अगदी मुंडनही केलं होतं. तिने ख्रिश्चन धर्म स्विकारला होता अशी अफवा पसरली होती. 

7/7

लडाखमध्ये बौद्ध ध्यान श्वासोच्छवासाचे तंत्र ती शिकली. ज्यामुळे तिला नैराश्यातून बाहेर येण्यासाठी मदत झाली असं तनुश्रीने सांगितलं.