#MeToo: तनुश्री दत्ताकडून अक्षय कुमारच्या भूमिकेचं स्वागत

बॉलिवूडचं जग इतकं संवेदनशिल आहे की, छोट्य़ा-छोट्या गोष्टी देखील येथे चर्चेला येतात. काही दिवसांपूर्वीच तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकरांवर असभ्य वर्तनाचे आरोप केले आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली.

Oct 17, 2018, 17:00 PM IST
1/6

2/6

एका मागे एक बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांवर आरोप होण्य़ास सुरुवात झाली आहे. हळूहळू तनुश्री दत्ताने सुरु केलेली #MeToo ची चळवळ सगळ्यात क्षेत्रात जावून धडकली आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गजांवर गंभीर आरोप होत आहेत.

3/6

अक्षय कुमारने आरोप झालेल्या व्यक्तींसोबत काम न करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खानला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

4/6

नाना पाटेकरांवर आरोप झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये 2 गट पडले. अनेकांनी तनुश्री दत्ताच्या बाजुने भूमिका घेतली तर काहींनी नाना पाटेकरांची बाजू धरली.

5/6

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत तनुश्रीला प्रश्न विचारण्यात आला की, आता नाना हाउसफुल 4 चा भाग नसणार आहे. तू या निर्णयावर आनंदी आहेस का?'.

6/6

''मला अजून पूर्णपणे आनंद झालेला नाही. कारण अजून या प्रकरणात खूप काही होण्याची गरज आहे. मला आनंद आहे की, अक्षय कुमार मीटूच्या सपोर्टमध्ये आला आणि त्याने आरोप झालेल्या कलाकारासोबत काम करण्यास नकार दिला.'