Tata Punch की Hyundai Exter; कोणी मारली बाजी? विक्रीचे खरे आकडे आले समोर

देशात गेल्या काही काळापासून मायक्रो किंवा मिनी स्पोर्ट्स युटिलिटी गाड्यांची क्रेझ प्रचंड वाढत आहे. कमी किंमत, पेट्रोलसह सीएनजी पर्याय, चांगला मायलेज आणि कमी मेंटेनन्स यामुळे ग्राहक आकर्षित होत आहेत. 

Feb 17, 2024, 17:08 PM IST

 

 

1/11

देशात गेल्या काही काळापासून मायक्रो किंवा मिनी स्पोर्ट्स युटिलिटी गाड्यांची क्रेझ प्रचंड वाढत आहे. कमी किंमत, पेट्रोलसह सीएनजी पर्याय, चांगला मायलेज आणि कमी मेंटेनन्स यामुळे ग्राहक आकर्षित होत आहेत.   

2/11

या सेगमेंटमध्ये टाटा पंच आणि ह्यंडाई एक्स्टर यांच्यात खरी स्पर्धा आहे. दोन्ही गाड्यांची किंमत जवळपास सारखीच आहे. टाटा पंच आणि एक्स्टरची किंमत 6.13 लाखांपासून सुरु होते आणि 10.28 लाखांपर्यंत जाते. पण दोन्ही गाड्यांच्या विक्रीच्या आकडेवारीत जवळपास दुप्पट अंतर पाहायला मिळत आहे. 

3/11

जानेवारी महिन्यातील विक्रीचे रिपोर्ट पाहिले तर टाटा पंचच्या एकूण 17 हजार 978 युनिट्सची विक्री झाली आहे. तर एक्स्टरच्या फक्त 8 हजार 229 युनिट्सची विक्री झाली आहे.   

4/11

समान किंमत, इंजिन क्षमता आणि समान स्पेस असतानाही टाटा पंचच्या तुलनेत एक्स्टरची विक्री कमी का झाली आहे याबद्दल जाणून घ्या.   

5/11

टाटा पंचमध्ये कंपनीने 1.2 लीटर इंजिनचा वापर केला आहे. जो 88 पीएसची पॉवर आणि 115Nm चा टॉर्क जनरेट करते.   

6/11

तर Hyundai Exter मध्ये कंपनीने 1.2 लीटर इंजिनचा वापर केला आहे. जे 83PS ची पॉवर आणि 114Nm चा टॉर्क जनरेट करते.   

7/11

दोन्ही एसयुव्हीत कंपनी फिटेड सीएनजीचा पर्याय आहे. टाटाने नुकतंच सीएनजी सेगमेंटमध्ये पाऊल ठेवलं आहे. पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते फार पुढे आहेत.   

8/11

टाटा पंचबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार पेट्रोल मोडमध्ये 20 किमी आणि सीएनजी मोडमध्ये 26.99 किमीचा मायलेज देते.   

9/11

तर एक्स्टरचं पेट्रोल व्हेरियंट 19 किमी प्रतीलिटर आणि सीएनजी मोडमध्ये कार 27.1 किमी/किग्रॅ मायलेज देते.   

10/11

फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास टाटा पंचमध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, 7 इंचाचा सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनेल, ऑटोमॅटिक एसी आणि क्रूझ कंट्रोलसारखे फिचर्स मिळतात.   

11/11

Exter मध्ये कंपनीने 8 इंचाची टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, 60 हून अधिक कनेक्टेड फिचर्स, वायरलेस फोन चार्जिंग, ऑटोमॅटिक एसी, सिंगल पॅन सनरुफ सारखे फिचर्स मिळतात.