लोकल ते ग्लोबल! आता 'या' देशातही भारताची UPI सेवा... पाहा कशी काम करणार?

UPI In Mauritius-Sri Lanka: भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI सर्व्हिस आता श्रीलंका आणि मॉरिशस या देशातही सुरु होणार आहे. पीएम मोदी यांनी व्हर्च्युअली पद्धतीने या दोन देशात यूपीआयचं लॉन्चिंग केलं. नुकतंच फ्रान्स देशात ही सेवा सुरु झाली आहे. 

| Feb 13, 2024, 19:52 PM IST
1/7

भारताची  युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI सर्व्हिस आता ग्लोबल होत चालली आहे. जगातील अनेक देशांनी यात उत्सुकता दाखवली आहे. आता या सर्व्हिसचा विस्तार होतोय. श्रीलंका (Sri Lanka) आणि मॉरिशस (Mauritius) या देशांमध्ये युपीआय सेवा सुरु करण्यात आली आहे. आता युएईमध्येही ही सेवा सुरु झाली आहे. 

2/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनौथ (Pravind Jugnauth) यांच्याबरोबरच तीनही देशांचे गव्हर्नरही उपस्थित होते. 

3/7

श्रीलंका आणि मॉरिशस UPI सेवा लाँच झाल्यानंतर या देशातील लोकांनी त्याचा वापर सुरु केला आहे. भारतातून श्रीलंका आणि मॉरिशला जाणारे किंवा श्रीलंका आणि मॉरिशसमधून भारतात येणारे पर्यटक युपीआय सेवेच्या माध्यमातून पेमेंट करु शकणार आहेत. मॉरिशसमध्ये UPI बरोबरच Rupay कार्ड सेवाही सुरु करण्यात आलीय. 

4/7

भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसची लोकप्रियता जागतिक पातळीवर वाढत आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे चालवली जाणारी ही सुविधा मोदी सरकारने 2016 मध्ये सुरु करण्यात आली. या सेवेमुळे ऑनलाईन पद्धतीने पैशांची घेवाण-देवाण सोपी झाली. 

5/7

युपीआय सेवेद्वारे रोख रकमेऐवजी पैसे थेट बॅँकेत जमा होतात. रिअल टाईममध्ये  पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होत असल्याने फसवणूकीची शक्यताही कमी आहे. या सेवेला IMPS मॉडेलद्वारे विकसित करण्यात आलं आहे. 

6/7

मॉरिशसमध्ये दरवर्षी जवळपास 5 हजार पर्यटक भारतातून येतात. इतकंच नाही तर मॉरिशसच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 हजार नागरिक भारतीय आहेत. मॉरिशसमध्ये UPI सेवा सुरु करण्याचा विचार भारतात संपन्न झालेल्या G20 समिटमध्ये झाला होता. आता  हा विचार प्रत्यक्षात साकारण्यात आला आहे. 

7/7

श्रीलंका आणि मॉरिशसच्या आधी युपीआय सेवा फ्रान्स, सिंगापूर, यूएई, नेपाळ, भूतान या देशात सुरु आहे. युपीआयमुळे ऑनलाईन ट्रान्सझेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका अहवालानुसार 2023 मध्ये 18.23 लाख रुपयांची युपीआयच्या माध्यमातून घेवाण-देवाण झाली होती.