'लोग क्या कहैंगे' याचा विचार मोडत, वयाचे बंधन जुगारत 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी हृदयाचे ऐकले अन्...

Bollywood Couples Who Tied Their Knot at Old Age: नुकतेच आशीष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरी लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सगळीकडेच एकच (Old Age Marriages) चर्चेचा विषय ठरला आहे. तेव्हा आता जाणून घेऊया अशा काही सेलिब्रेटींविषयी ज्यांनीही वयाच्या 50-60 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. 

| May 26, 2023, 17:26 PM IST

Bollywood Couples Who Tied Their Knot at Old Age: ज्येष्ठ अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सध्या त्यांची बरीच चर्चा रंगताना दिसते आहे. प्रेमाला वयाचे बंधन नसते हे आपण जे म्हणतो ते खरंच आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूलाही अशीच उदाहरणं दिसून लागली आहेत. पण तुम्हाला माहितीये का की आशिष विद्यार्थी हे काही पहिलेच नाहीत. याआधीही अनेक मोठ्या, नावाजलेल्या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनीही आपल्या म्हातारपणात लग्नगाठ बांधली आहे. 

1/5

जेनिफर लोपेज आणि बेन अफ्लेक

Jennifer Lopez and Ben Affleck

हॉलिवूडची गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेन्ज हिनं वयाच्या 52 व्या वर्षी अभिनेता बेन एफ्लेकशी लग्न केले. हे तिचे चौथे लग्न आहे. 

2/5

संजय दत्त आणि मान्यता दत्त

Sanjay Dutt and Manyata Dutt

वयाच्या 50 व्या वर्षी 29 वर्षीय मान्यताशी संजय दत्तनं लग्नगाठ बांधली. 2008 साली त्यांचे लग्न झाले. त्यांना दोन मुलंही आहेत. संजय दत्तचे हे दुसरे लग्न आहे आणि पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगीही आहे. 

3/5

नीना गुप्ता आणि विवेक मेहेरा

Neena Gupta and Vivek Mehra

नीना गुप्तानं 2008 साली विवेक मेहेरा यांच्यासोबत वयाच्या 54 व्यावर्षी लग्नगाठ बांधली होती. नीना गुप्ता विव रिचर्ड्ससोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत आली होती. त्यांना लग्नाआधी मुलगी झाली होती. मसाबा ही लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे.

4/5

सुहासिनी मुळे आणि अतुल गुर्टु

Suhasini Mule and Atul Gurtu

लोकप्रिय अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अतुल गुर्टूंसोबत लग्नगाठ बांधली होती. सुहासिनी मुळे या मराठी कुटुंबांतून आल्या आहेत. त्यांची भेट सोशल मीडियावर झाली होती. 

5/5

कबीर बेदी आणि परवीन दोसांझ

Kabir Bedi and Parveen Dosanj

कबीर बेदीनं वयाच्या 70 व्या वर्षी परवीन दोसांझसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाची तेव्हा खूप चर्चा झाली आहे. कबीर बेदी हे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते आहेत. त्यांचे हे चौथे लग्न होते.