Troubled Relationship: 'या' लक्षणांवरून ओळखू शकता तुमचा पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवतोय!

Troubled Relationship:  वैवाहिक जीवनातील सर्वात मोठं तत्व म्हणजे प्रामाणिकपणा. जेव्हा हा प्रामाणिकपणा कमी होऊ लागतो, तेव्हा संघर्ष आणि नात्याचा तडा जातो. कधीकधी एखादी छोटी गोष्ट लपवणं ही समस्या नसते, परंतु जेव्हा पुन्हा पुन्हा गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला तर ते कठीण होऊ लागते. तुमचा पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवत तर नाही ना हे आपल्याला या लक्षणांवरून समजण्यास मदत होईल.

| Aug 28, 2023, 21:00 PM IST
1/5

पती किंवा पत्नीच्या नियमित दिनचर्येत अचानक बदल होण्याचा अर्थ तो काहीतरी लपवत आहेत असा असू शकतो. वाटणे. अचानक नवीन छंद जोपासणे आणि त्यासाठी घराबाहेर जास्त वेळ घालवणं, हा देखील एक संकेत असू शकतो. 

2/5

तुम्ही समोर येताच फोन किंवा लॅपटॉपचा स्क्रीन अचानक बंद करत असेल तर यावर लक्ष ठेवावं. लक्षात ठेवा पती-पत्नीमध्ये असं काहीही नाही जे शेअर केलं जाऊ शकत नाही. 

3/5

नात्यात अचानक अंतर निर्माण होत असेल तर हीच ती वेळ असू शकते. तोच नवरा किंवा बायको जो पूर्वी तुमच्यासोबत बसून चहाचा आनंद घ्यायचा, घराबाहेर गप्पा मारत आणि हसत असे. मात्र अचानक या गोष्टींपासून दूर जात असेल तर हे संकेत असू शकतात.

4/5

कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यात विनाकारण चिडचिड, भांडण आणि राग येऊ शकतो. पण ती रोजचीच झाली तर सावध राहून समजून घेणं गरजेचं होतं. 

5/5

अचानक, तुमच्या नकळत, तुमच्या बँकेच्या खात्यातून पैसे गायब होऊ लागतात किंवा तुमच्या दोघांच्या ओळखीच्या घरात ठेवलेले पैसे गायब होत असीतल तर हे काळजी करण्यासारखं असू शकतं.