नानांच्या वाईट स्वभावाविषयी डिंपल कपाडिया म्हणाल्या....

Oct 02, 2018, 16:05 PM IST
1/5

नानांच्या वाईट स्वभावाविषयी डिंपल कपाडिया म्हणाल्या....

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप केल्यापासून बऱ्याच चर्चांना तोंड फुटल्याचं पाहायला मिळालं. अनेक सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर आपलं मत मांडत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर बिग बी अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी मात्र  या प्रकरणी मौन पाळण्यास प्राधान्य दिलं.   

2/5

नानांच्या वाईट स्वभावाविषयी डिंपल कपाडिया म्हणाल्या....

नाना आणि तनुश्री वाद प्रकरणात काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्या व्हिडिओमधूनही बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. असाच एक व्हिडिओ सध्या प्रकाशझोतात आला असून, अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी नानांच्या स्वभावाविषयी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे. 

3/5

नानांच्या वाईट स्वभावाविषयी डिंपल कपाडिया म्हणाल्या....

काही वर्षांपूर्वी चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या स्वभावाची वेगळी बाजू सर्वांसमोर आणली आहे. त्यांच्या स्वभावाविषयीचा प्रश्न विचारताच एका वेगळ्या नानांना आपण पाहिल्याचं डिंपल कपाडिया यांनी सांगितलं आहे. 'अंकुश', 'अंगार', 'क्रांतीवीर' या चित्रपटांमध्ये नानांसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या डिंपल यांनी त्यांच्या स्वभावाचा वेगळा पैलू या समुलाखतीत सर्वांसमोर ठेवला होता. 

4/5

नानांच्या वाईट स्वभावाविषयी डिंपल कपाडिया म्हणाल्या....

'नानांच्या स्वभावाविषयी म्हणावं तर ते फारच वेगळ्या स्वभावाचे आहेत. चित्रपटाच्या सेटवरही ते फार कमी लोकांशी मैत्री करतात. मुळात त्यांच्या स्वभावातील काही गोष्टी खटकतातही. पण, एक कलाकार म्हणून त्यांच्यात असणारे कलागुण पाहता या नकारात्मक गोष्टींवर हे कलागुण खऱ्या अर्थाने वरचढ ठरतात. मग अशा व्यक्तीचे सर्व गुन्हे, चुकाही माफ असतात', असं डिंपल म्हणाल्या होत्या. 

5/5

नानांच्या वाईट स्वभावाविषयी डिंपल कपाडिया म्हणाल्या....

इथे लक्षात घेण्याजोगी बाब ही आहे, की नाना आणि तनुश्रीमधील वादाचा आणि या व्हिडिओचा थेट संबंध नाही. पण, नाना पाटेकर यांच्या तापट स्वभावाच्या चर्चा रंगल्यामुळेच हा व्हिडिओ व्हायरल झाला असावा असं म्हटलं जात आहे.