आर्यन खानसोबत सेल्फी ते 25 कोटींची डील... वानखेडेंसोबत दिसलेला किरण गोसावी कुठेय?

Kiran Gosavi : आर्यन खान ड्रग प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) साक्षीदार किरण गोसावी याला 28 ऑक्टोबर 2021 रोजी पुण्यातून अटक करण्यात आली होती.  2018 च्या फसवणूक प्रकरणात गोसावीला अटक करण्यात आली होती.

May 16, 2023, 11:23 AM IST
1/8

cruise ship drug raid

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावी याने त्याचा सहकारी सॅनविल डिसोझा आणि इतरांसोबत षडयंत्र रचून आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानला धमकावून 25 कोटी रुपये उकळण्याचा कट रचला होता.

2/8

bribe demand from Shah Rukh Khan family to spare Aryan Khan

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी पर्यंत ड्रग्ज प्रकरणात आर्यनच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर तिने त्याला सोडवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्यावेळी किरण गोसावी पुढे आला होता.

3/8

deal to free Aryan Khan

गोसावी आणि दादलनाही यांची भेट झाली आणि आर्यनला सोडवण्यासाठी एक डील झाली. डीलमध्ये आर्यन खानला सोडण्याची किंमत 25 कोटी ठेवण्यात आली होती पण नंतर हे प्रकरण 18 कोटींवर मिटले. पूजा ददलानीने गोसावीला 50 लाखांची रोकड दिली.

4/8

pooja dadlani srk manager

पण किरण गोसावीचा आर्यनसोबतचा सेल्फी व्हायरल झाला आणि प्रकरण फिस्कटले. गोसावी हा एनसीबी अधिकारी नसल्याचे पूजा दादलानीला समजले आणि कोटींची डील अडचणीत आली.

5/8

kiran gosavi pooja pooja dadlani deal

त्यानंतर किरण पूजा ददलानीला भेटला आणि त्याने 50 लाखांपैकी 38 लाख परत केले. तसेच उर्वरित 12 लाख समीर वानखेडेकडे पोहोचल्याचे गोसावीने सांगिलते.आर्यनला अटक करून कोर्टात हजर होईपर्यंत पैसे परत मिळणार नाही असेही गोसावीने सांगितले.

6/8

kiran gosavi sameer wankhede

आर्यन खान प्रकरणात गोसावी पूजा ददलानीशी फेस टाइम चॅटद्वारे बोलत होते. दुसरीकडे, दुसर्‍या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गोसावी हा समीर वानखेडेंना या डीलशी संबंधित अपडेट्सही देत ​​होता. एनसीबीने यासंबंधीचे पुरावे गोळा केले आहेत.

7/8

Kiran Gosavi absconding in fraud case

फसवणूक प्रकरणात गोसावी फरार होता पुणे पोलिसांनी त्याला वॉण्टेड घोषित केले होते. पुणे पोलिसांनी गोसावी याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली होती. शेवटी पुण्यात त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.

8/8

KP Gosavi KPG Dreamz Solution

किरण गोसावी KPG Dreamz Solution नावाची कंपनी चालवत होता. त्याने विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमध्ये अनेकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. गोसावी याची कंपनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करत असे. दरम्यान, गोसावी याच्यावर मलेशियातील एका हॉटेलमध्ये नोकरीच्या बहाण्याने 3.9 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता.