PHOTO : 8 अफेअर्स, 3 लग्नं, 2 सुपरस्टारमध्ये तिच्यासाठी वैर; तरीसुद्धा ती सहन करत होती पतीचा जाच

70 च्या दशकात आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने सिनेसृष्टीवर राज्य करणारी बॉलीवूडमधील ही अभिनेत्री लाखो हृदयांची राणी असायची. 8 अफेअर्स, 3 लग्नं, 2 सुपरस्टारमध्ये तिच्यासाठी वैर झालं. 

May 04, 2024, 23:20 PM IST
1/8

तिच्या आयुष्यात ती अनेक वेळा प्रेमात पडली. यातील एक नाव होतं सुपरस्टार देवानंद. या दोघांनी हरे राम हरे कृष्णा या चित्रपटात काम केलं होतं. 

2/8

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि देवानंद आणि झीनत अमानशीची जवळीक वाढली. त्या काळात झीनत स्टार झाल्या नंतर एका पार्टी दरम्यान त्या राज कपूरशी बोलत असताना देवानंद यांना राग अनावर झाला 

3/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झीनत आणि राज कपूर यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर देवानंद आणि राज कपूर यांच्यामध्ये मदभेद झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या.

4/8

या दोघानंतर झीनत यांचं नाव पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानशी जोडल्या गेलं होतं. 

5/8

त्यानंतर 1978 मध्ये झीनत अमान यांनी गुपचूप संजय खानशी लग्न केलं. पण हे लग्न लपून राहिलं नाही. काही दिवसांमध्येच त्यांच्यामधील वाद समोर आले. झीनत अमाने पतीवर मारहाणीचा आरोप लावला. 

6/8

एवढंच नाही तर एकदा संजय यांनी इतकं मारलं की झीनत रुग्णालयात पोहोचल्या होत्या. तब्बल दोन वर्ष अभिनेत्रीने पतीच्या जाचाचा सामना केला. यानंतर त्यांनी हे नातं संपलं. 

7/8

अनेक वर्ष एकटं राहिल्यानंतर त्यांनी मजहर खानशी दुसरं लग्न केलं. याही लग्नाबद्दल कोणाही माहिती नव्हतं. हे लग्न काही वर्षांमध्ये संपुष्टात आलं. 

8/8

यानंतर झीनत अमानने वयाच्या 54 व्या वर्षी तिसरं लग्न करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. अभिनेत्रीने 2012 मध्ये तिच्या वयापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या अमन खन्नासोबत लग्नगाठ बांधली. पण या लग्नालाही यश मिळालं नाही. काही वर्षातच दोघेही वेगळे झाले. झीनत अमान आता वयाच्या 72व्या वर्षी एकटीच आयुष्य जगत आहेत.