Extra Marital Affair facts: पत्नी असूनही विवाहबाह्य संबंधाचा विचार का करतात पुरुष? रिसर्चमधून सत्य समोर

Extra Marital Affair facts: एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र त्या आकर्षणामुळे आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत असेल कर ते चुकीचं मानलं जातं. कोणत्याही गोष्टीला योग्य की अयोग्य ठरवण्याआधी त्या गोष्टीचे कारण काय आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

Updated: Sep 3, 2023, 05:33 PM IST
Extra Marital Affair facts: पत्नी असूनही विवाहबाह्य संबंधाचा विचार का करतात पुरुष? रिसर्चमधून सत्य समोर title=

Extra Marital Affair facts: लग्नानंतर अनेक पुरुष दुसऱ्या महिलांकडे आकर्षित होतात. आपल्या प्रत्येकाला माहितीये की, असं करणं चूक आहे. मात्र जर पुरुष दुसऱ्या महिलेला पाहून केवळ तिच्या सौंदर्याची तारीफ करत असेल तर त्यात काही गौर नाही. मात्र जर एखादी व्यक्ती त्यापुढे जात असेल तर तसं करणं अयोग्य मानलं जातं.

एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र त्या आकर्षणामुळे आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत असेल कर ते चुकीचं मानलं जातं. कोणत्याही गोष्टीला योग्य की अयोग्य ठरवण्याआधी त्या गोष्टीचे कारण काय आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक्स्ट्रा-मॅरिटल अफेयर म्हणजेच विवाहबाह्य संबंध असण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु ती कारणं वेळीच ओळखली तर या समस्येवर मात करता येते.

बहुतेक प्रकरणांमध्ये एक्स्ट्रा-मॅरिटल अफेयर हे वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे उद्भवतात. परंतु हे एकमेव कारण नाही. नुकतंच संशोधनातून पुरुष विवाहबाह्य संबंध का ठेवतात, याची काही कारणं समोर आली आहेत. 

सेक्शुअल सॅटीस्फॅक्शन न मिळणं

पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवण्यामागे एक कारण असतं ते म्हणजे लैंगिक समाधान. जर पुरुषाला स्त्रीकडून लैंगिक समाधान मिळत नसेल तर तो पुरुष दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होऊ लागतो. काही प्रकरणांमध्ये हे एकमात्र कारण ठरतं एक्स्ट्रा-मॅरिटल अफेयर ठेवण्यामागे. 

अतिरिक्त संबंधांवर विश्वास 

एकीकडे वैवाहिक संबंध यशस्वी ठेवण्यासाठी यशस्वी लैंगिक जीवन आवश्यक असतं. दुसरीकडे काही लोक अस असतात ज्यांना अतिरिक्त संबंधांबाबत लालसा असते. आपल्या जोडीदारावर समाधानी असूनही ते दुसऱ्याशी नातं जोडण्यासाठी उत्सुक असतात. त्यावेळी पुरुष दुसऱ्या महिलेचा विचार करू लागतात.

कमी वयात लग्न होणं

कौटुंबिक आणि समाजामुळे काही व्यक्तींची लग्नं कमी वयात होतात. यावेळी असे लोक जेव्हा आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचतात तेव्हा त्यांना वाटतं की, जीवनात आपण खूप काही गमावलंय. अशा परिस्थितीत ते विवाहबाह्य संबंधांचा विचार करत असल्याचं संशोधनातून समोर आलंय. 

जोडप्याला ज्यावेळी बाळ होतं

एखादे जोडपे पालक बनताच त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. यावेळी जोडप्यामधील प्राधान्य देण्याच्या गोष्टींमध्ये बदल होतात. बर्याचदा अशा परिस्थितीत, पुरुष त्यांच्या पत्नींबद्दल निराश होतात कारण ते त्यांच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवू लागतात. अशावेळी त्यांना दुसऱ्या महिलेशी संबंध जोडणं योग्य वाटत असल्याचं, संशोधनातून समोर आलंय. 

अचानक भ्रमनिरास होते तेव्हा

ज्यावेळी पुरुष आपल्या जोडीदाराची इतरांशी तुलना करू लगाते तेव्हा नातं तुटण्याची अधिक शक्यता असते. अचानक कोणीतरी तुम्हाला सुंदर आणि तुमचा स्वतःचा जोडीदार आवडू लागत नाही. त्याचे सर्व गुण तुमच्यासाठी अवगुण बनतात. याचाच अर्थ त्या पुरुषाला दुसऱ्या महिलेच्या विचारात असतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती रिसर्चवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )