Patch Up Tips: तुम्हालाही पॅचअप करायचंय? 'या' टिप्स ठरतील फायद्याच्या

सध्याच्या सुपरफास्ट जगात नाती जेवढ्या झटकन जुळतात, तेवढ्याच पटकन संपतानाही पाहायला मिळतात

Updated: Sep 2, 2022, 02:46 PM IST
Patch Up Tips: तुम्हालाही पॅचअप करायचंय? 'या' टिप्स ठरतील फायद्याच्या  title=

Relationships and patchup tips: सध्याच्या सुपरफास्ट जगात नाती जेवढ्या झटकन जुळतात, तेवढ्याच पटकन संपतानाही पाहायला मिळतात. अनेकदा एखादं नातं गैरसमजामुळे किंवा अगदी शुल्लक कारणावरून संपतं. अनेकदा नातं तुटण्यामागे कुणाचातरी इगो आडवा येतो.

अशात शुल्लक कारणावरून झालेलं भांडण, लहानशा कारणावरून तुटलेलं नातं, तुम्हाला पुन्हा पूर्ववत करायचं झाल्यास तुम्ही खालील काही महत्त्वाच्या टिप्स वापरू शकतात. 

तुमचं ब्रेकअप झाल्यांनंतरही तुम्हाला तुमच्या पार्टनरची आठवण येत असेल, किंवा तुम्हाला पार्टनरशिवाय राहताच येत नसेल, तर तुही खालील काही टिप्स वापरून पॅच अप करू शकतात. 

एक छानसा मेसेज पाठवा 

अनेकदा तुम्ही जे थेट समोरासमोर बोलू शकत नाहीत ते मेसेजच्या माध्यमातून बोलू शकतात. म्हणून तुम्ही तुमच्या नाराज पार्टनरला एक छान मेसेज पाठवू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्यामधील लेखकाला जागं करावं लागेल.

या मेसेजची सुरुवात तुम्ही तुमची चूक मान्य करून करू शकतात. यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरची स्तुती करू शकतात. सोबतच तुमचा पार्टनर तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हेही लिहू शकतात. 

कॉमन फ्रेंड सोबत चर्चा करा

ब्रेकअप झाल्यानंतर Whatsapp ग्रुप सोडणे, एकमेकांना ब्लॉक करणे हे होत असतं. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत थेट बोलणं टाळतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींच्या माध्यमातून तुमच्या पार्टनरसोबत बोलू शकतात.

मात्र, मित्रांशी बोलताना तो मित्र किंवा मैत्रीण खरंच भरवशाची आणि न्यूट्रल आहे का याचीही खातरजमा करून घ्या. 

सोशल मीडियावर लिखाण 

अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर भावुक होऊन सोशल मीडियावर लिखाण केलं जातं. अनेकदा आपल्या पार्टनरविरोधात अप्रत्यक्षपणे लिखाण केलं जातं. मात्र ही चुकीची पद्धत आहे. अशाने तुमच्या पॅचअपच्या सर्व शक्यता संपू शकतात. म्हणूनच तुमच्या पार्टनरबाबत सोशल मीडियावर लिखाण करू नका.

(विशेष नोंद - वरील बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा दैनंदिन आयुष्यात वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वरील बातमीतील सत्य असत्यतेबाबत Zee24Taas पुष्टी करत नाही. )