महिला दिन : झगमगत्या जगात...

Mar 07, 2013, 09:07 AM IST
1/11

इंग्लिश विंग्लिश (२०१२)श्रीदेवीनं ‘इंग्लिश विंग्लिश’च्या साहाय्यानं तब्बल १५ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. गौरी शिंदे या मराठमोळ्या दिग्दर्शिकेच्या नजरेतून साकारलेली एका साध्यासुध्या महिलेची ही कहाणी... गौरीनं दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा होता. पण, या पहिल्याच सिनेमानं तीनं आपलं वलय बॉलिवूडमध्ये निर्माण केलंय. महिला सशक्तीकरणावर भाष्य करणाऱ्या या सिनेमातून श्रीदेवीनं पुन्हा एकदा बॉलिवूडला आपली दखल घ्यायला लावली. प्रेक्षकांना आपल्या आजुबाजुला वावरणाऱ्या, साध्यासुध्या दिसणाऱ्या, इंग्रजी न बोलता येणाऱ्या, आपल्या कुटुंबाशी एककेंद्री असणाऱ्या महिलांकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला या सिनेमानं भाग पाडलं..

इंग्लिश विंग्लिश (२०१२)

श्रीदेवीनं ‘इंग्लिश विंग्लिश’च्या साहाय्यानं तब्बल १५ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. गौरी शिंदे या मराठमोळ्या दिग्दर्शिकेच्या नजरेतून साकारलेली एका साध्यासुध्या महिलेची ही कहाणी... गौरीनं दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा होता. पण, या पहिल्याच सिनेमानं तीनं आपलं वलय बॉलिवूडमध्ये निर्माण केलंय. महिला सशक्तीकरणावर भाष्य करणाऱ्या या सिनेमातून श्रीदेवीनं पुन्हा एकदा बॉलिवूडला आपली दखल घ्यायला लावली. प्रेक्षकांना आपल्या आजुबाजुला वावरणाऱ्या, साध्यासुध्या दिसणाऱ्या, इंग्रजी न बोलता येणाऱ्या, आपल्या कुटुंबाशी एककेंद्री असणाऱ्या महिलांकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला या सिनेमानं भाग पाडलं..

2/11

‘द डर्टी पिक्चर’ (२०११)‘सिल्क स्मिता’च्या भूमिकेतील बोल्ड विद्या बालननं उत्कृष्ठ अभिनेत्रीसाठी असणारा आणखी एक फिल्मफेअर पुरस्कार विद्यानं आपल्या नावावर केला. मिलन लुथारिया दिग्दर्शित ‘द डर्टी पिक्चर’नं विद्याच्या अभिनयाला आणि करिअरला एक वेगळंच आकार दिला. हा सिनेमा एका दक्षिण भारतीय ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच्या – सिल्कच्या -  खऱ्याखुऱ्या आयुष्यावर बेतलेला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक दिवस या सिनेमांची चर्चा प्रेक्षकांच्या तोंडी होती.

‘द डर्टी पिक्चर’ (२०११)

‘सिल्क स्मिता’च्या भूमिकेतील बोल्ड विद्या बालननं उत्कृष्ठ अभिनेत्रीसाठी असणारा आणखी एक फिल्मफेअर पुरस्कार विद्यानं आपल्या नावावर केला. मिलन लुथारिया दिग्दर्शित ‘द डर्टी पिक्चर’नं विद्याच्या अभिनयाला आणि करिअरला एक वेगळंच आकार दिला. हा सिनेमा एका दक्षिण भारतीय ‘सेक्स सिम्बॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच्या – सिल्कच्या - खऱ्याखुऱ्या आयुष्यावर बेतलेला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक दिवस या सिनेमांची चर्चा प्रेक्षकांच्या तोंडी होती.

3/11

नो वन किल्ड जेसिका (२०११)दिल्लीत घडलेल्या एका खऱ्याखुऱ्या कथेवर आधारित या सिनेमानं अनेक विषयांना हात घातला. जेसिका लाल हत्या प्रकरणावर आधारित हा सिनेमा दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या नजरेतून प्रेक्षकांसमोर आला. दोन महिलांवर केंद्रीत ‘नो वन किल्ड जेसिका’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका राणी मुखर्जी आणि विद्या बालन या दोघींनी निभावल्या. राणी एका धडाडी पत्रकाराच्या भूमिकेत तर विद्या जेसिकाच्या कणखर बहिणीच्या रुपात प्रेक्षकांना भावल्या. यावर्षीचा उत्कृष्ट सह-कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार राणीनं पटकावला.

नो वन किल्ड जेसिका (२०११)

दिल्लीत घडलेल्या एका खऱ्याखुऱ्या कथेवर आधारित या सिनेमानं अनेक विषयांना हात घातला. जेसिका लाल हत्या प्रकरणावर आधारित हा सिनेमा दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या नजरेतून प्रेक्षकांसमोर आला. दोन महिलांवर केंद्रीत ‘नो वन किल्ड जेसिका’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका राणी मुखर्जी आणि विद्या बालन या दोघींनी निभावल्या. राणी एका धडाडी पत्रकाराच्या भूमिकेत तर विद्या जेसिकाच्या कणखर बहिणीच्या रुपात प्रेक्षकांना भावल्या. यावर्षीचा उत्कृष्ट सह-कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार राणीनं पटकावला.

4/11

इश्किया (२०१०)दिग्दर्शक अभिषेक चौबे दिग्दर्शित एक ‘ब्लॅक कॉमेडी थ्रीलर’… सिनेमातील मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत होती विद्या बालन. षडयंत्र रचणारी आणि मोहक अदांनी घायाळ करणारी विद्या या सिनेमात भाव खाऊन गेली. अनुभवी अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अर्षद वारसी हे या सिनेमात असूनही विद्यानं प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं. या सिनेमासाठी विद्यानं फिल्मफेअरचा उत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार पटकावला.

इश्किया (२०१०)

दिग्दर्शक अभिषेक चौबे दिग्दर्शित एक ‘ब्लॅक कॉमेडी थ्रीलर’… सिनेमातील मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत होती विद्या बालन. षडयंत्र रचणारी आणि मोहक अदांनी घायाळ करणारी विद्या या सिनेमात भाव खाऊन गेली. अनुभवी अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अर्षद वारसी हे या सिनेमात असूनही विद्यानं प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं. या सिनेमासाठी विद्यानं फिल्मफेअरचा उत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार पटकावला.

5/11

डोर (२००६)दोन महिलांच्या परस्पर विरोधी तरीही साधर्म्य साधणाऱ्या भूमिका या सिनेमात पाहायला मिळाल्या. या दोघींचं नशीब त्यांना एकत्र आणतं आणि त्यांची ‘डोर’ एकमेकींना नकळतपणे जोडली जाते. ‘त्या दोघी’ एकमेकींसाठीच ठरतात प्रेरणा... ‘डोर’ हा एकीकडे महिला सशक्तीकरण, जागरुकता आणि ‘बहिणीत्वा’वर भाष्य करतो सोबतच दुसऱ्या टोकाला जाऊन महिलांच्या विचारांची आणि वर्तवणुकीची काळ्या बाजूवरही प्रकाश टाकतो. अभिनेत्री गुल पनाग आणि आएशा टाकिया या दोघींनीही यात उल्लेखनीय भूमिका निभावल्यात.

डोर (२००६)

दोन महिलांच्या परस्पर विरोधी तरीही साधर्म्य साधणाऱ्या भूमिका या सिनेमात पाहायला मिळाल्या. या दोघींचं नशीब त्यांना एकत्र आणतं आणि त्यांची ‘डोर’ एकमेकींना नकळतपणे जोडली जाते. ‘त्या दोघी’ एकमेकींसाठीच ठरतात प्रेरणा... ‘डोर’ हा एकीकडे महिला सशक्तीकरण, जागरुकता आणि ‘बहिणीत्वा’वर भाष्य करतो सोबतच दुसऱ्या टोकाला जाऊन महिलांच्या विचारांची आणि वर्तवणुकीची काळ्या बाजूवरही प्रकाश टाकतो. अभिनेत्री गुल पनाग आणि आएशा टाकिया या दोघींनीही यात उल्लेखनीय भूमिका निभावल्यात.

6/11

परिणीता (२००५)सिनेमाच्या नावावरूनच या सिनेमाचा अंदाज लावता येतो... परिणीता म्हणजेच ‘विवाहीत स्त्री’... प्रसिद्ध लेखक शरतचंद्र चॅटर्जी यांच्या एका कादंबरीवर सिनेमाची कथा बेतलेली आहे. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या नजरेतून मोठ्या पडद्यावर साकारलेली... विद्या बालननं आपल्या अभिनयानं साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली. ‘परिणीता’ला अनेक अॅवॉर्डसहीत प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला. सैफ अली खान, संजय दत्त आणि रायमा सेन यांनी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका निभावल्या.

परिणीता (२००५)

सिनेमाच्या नावावरूनच या सिनेमाचा अंदाज लावता येतो... परिणीता म्हणजेच ‘विवाहीत स्त्री’... प्रसिद्ध लेखक शरतचंद्र चॅटर्जी यांच्या एका कादंबरीवर सिनेमाची कथा बेतलेली आहे. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या नजरेतून मोठ्या पडद्यावर साकारलेली... विद्या बालननं आपल्या अभिनयानं साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली. ‘परिणीता’ला अनेक अॅवॉर्डसहीत प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला. सैफ अली खान, संजय दत्त आणि रायमा सेन यांनी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका निभावल्या.

7/11

चमेली (२००४)चमेली... ही कहाणी आहे एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीची... आणि हीच तरुणी अवघ्या काही तासांत एका इन्व्हेस्टमेंट बँकर असलेल्या तरुणाच्या जीवनात त्याच्या जगण्याच्या तत्वात आरपार बदल घडवून आणते. करीना कपूर आणि राहुल बोस यांच्या जबरदस्त अभिनयाची झलक या सिनेमात पाहायला मिळते. दिग्दर्शक आनंद बालन आणि सुधीर मिश्रा यांनी हा विषय मोठ्या खुबीनं हाताळलाय.

चमेली (२००४)

चमेली... ही कहाणी आहे एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीची... आणि हीच तरुणी अवघ्या काही तासांत एका इन्व्हेस्टमेंट बँकर असलेल्या तरुणाच्या जीवनात त्याच्या जगण्याच्या तत्वात आरपार बदल घडवून आणते. करीना कपूर आणि राहुल बोस यांच्या जबरदस्त अभिनयाची झलक या सिनेमात पाहायला मिळते. दिग्दर्शक आनंद बालन आणि सुधीर मिश्रा यांनी हा विषय मोठ्या खुबीनं हाताळलाय.

8/11

मातृभूमी (२००३)स्त्रियांशिवाय जग कसं असेल? याचा विचार आपण कधी केलाय का? लेखक-दिग्दर्शक मनिष झा यांनी हा विचार केला आणि स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयाला हात घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुलिप जोशी हिनं यात मध्यवर्ती भूमिका निभावली. या सिनेमातील पुरुषांच्या गर्दीत हरवलेली एकटी महिला पण तरीही उठून दिसणारी... एका जिवंत विषयाला अत्यंत बोल्ड पद्धतीनं हाताळताना या सिनेमानं प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली.

मातृभूमी (२००३)

स्त्रियांशिवाय जग कसं असेल? याचा विचार आपण कधी केलाय का? लेखक-दिग्दर्शक मनिष झा यांनी हा विचार केला आणि स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयाला हात घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुलिप जोशी हिनं यात मध्यवर्ती भूमिका निभावली. या सिनेमातील पुरुषांच्या गर्दीत हरवलेली एकटी महिला पण तरीही उठून दिसणारी... एका जिवंत विषयाला अत्यंत बोल्ड पद्धतीनं हाताळताना या सिनेमानं प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली.

9/11

बॉलिवूडचा धांडोळा...जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण धांडोळा घेतोय बॉलिवूडमधल्या काही स्त्री केंद्रीत सिनेमांचा... गेल्या काही वर्षातील सिनेमांकडे पाहिलं तर अशा बोटांवर मोजण्याइतकेच सिनेमे सापडतील ज्यामध्ये स्त्रियांच्या मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमांत स्त्रियांचा दिखाव्यासाठी होणारा वापर हा चर्चेचा विषय ठरतोय. एक नजर टाकुयात, अशा काही सिनेमांवर ज्यांनी गेल्या दहा वर्षात दिलंय स्त्रियांना महत्त्वपूर्ण स्थान आणि सन्मान...

बॉलिवूडचा धांडोळा...
जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण धांडोळा घेतोय बॉलिवूडमधल्या काही स्त्री केंद्रीत सिनेमांचा... गेल्या काही वर्षातील सिनेमांकडे पाहिलं तर अशा बोटांवर मोजण्याइतकेच सिनेमे सापडतील ज्यामध्ये स्त्रियांच्या मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमांत स्त्रियांचा दिखाव्यासाठी होणारा वापर हा चर्चेचा विषय ठरतोय.

एक नजर टाकुयात, अशा काही सिनेमांवर ज्यांनी गेल्या दहा वर्षात दिलंय स्त्रियांना महत्त्वपूर्ण स्थान आणि सन्मान...

10/11

फॅशन (२००८)झगमगत्या दुनियेतील स्त्रियांवर भाष्य करणारा हा सिनेमा दिग्दर्शक मधूर भांडारकरच्या नजरेतून प्रेक्षकांसमोर आला. ‘फॅशन’ जगतातील स्त्रियांच्या जीवनाची झलक दाखवण्याचा प्रयत्न मधूरनं केला. त्यांच्या महत्त्वकांक्षा आणि या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जीवनात आलेला काळोख... या सिनेमानं दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. पहिला होता प्रियांका चोप्रा हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तर दुसरा होता कंगना रानावत हिला उत्कृष्ट सहकलाकार म्हणून....

फॅशन (२००८)

झगमगत्या दुनियेतील स्त्रियांवर भाष्य करणारा हा सिनेमा दिग्दर्शक मधूर भांडारकरच्या नजरेतून प्रेक्षकांसमोर आला. ‘फॅशन’ जगतातील स्त्रियांच्या जीवनाची झलक दाखवण्याचा प्रयत्न मधूरनं केला. त्यांच्या महत्त्वकांक्षा आणि या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जीवनात आलेला काळोख... या सिनेमानं दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. पहिला होता प्रियांका चोप्रा हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तर दुसरा होता कंगना रानावत हिला उत्कृष्ट सहकलाकार म्हणून....

11/11

चक दे (2007)मैदानातील महिलांच्या लढ्याची ही कहाणी... मैदानातील असेल तरीही सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावरही महिलांच्या स्थानावर भाष्य करणारी... बोट ठेवणारी... ‘महिला हॉकी’ हा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आलेल्या या सिनेमानं महिलांमध्ये आणि खेळ जगतात चांगलीच जाणीव घडवून आणली. प्रत्येक क्षेत्रातल्या प्रेक्षकांनी या सिनेमाला मनापासून दाद दिली. अभिनेता शाहरुख खान यानं या सिनेमात निभावलेली हॉकी कोचची भूमिका प्रेक्षकांना भावली. शाहरुखची या सिनेमातील भूमिका ही त्याच्या आजवरच्या सिनेमांमधील महत्त्वाची भूमिका ठरली.

चक दे (2007)

मैदानातील महिलांच्या लढ्याची ही कहाणी... मैदानातील असेल तरीही सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावरही महिलांच्या स्थानावर भाष्य करणारी... बोट ठेवणारी... ‘महिला हॉकी’ हा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आलेल्या या सिनेमानं महिलांमध्ये आणि खेळ जगतात चांगलीच जाणीव घडवून आणली. प्रत्येक क्षेत्रातल्या प्रेक्षकांनी या सिनेमाला मनापासून दाद दिली. अभिनेता शाहरुख खान यानं या सिनेमात निभावलेली हॉकी कोचची भूमिका प्रेक्षकांना भावली. शाहरुखची या सिनेमातील भूमिका ही त्याच्या आजवरच्या सिनेमांमधील महत्त्वाची भूमिका ठरली.