शशी कपूर

Mar 18, 2013, 07:29 PM IST

पुरस्कार

समीक्षकांनीही शशी कपूरबद्दल नेहमीच गौरवोद्गार काढले. १९८५ सली ‘न्यू दिल्ली टाइम्स’ चित्रपटातील भूमिकेबद्दल शशी कपूरला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तसंच शशी कपूरला पद्मभुषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
1/8

निर्माता

अभिनयाव्यतिरिक्त सिने निर्मितीत वेगळे प्रयोग करण्याच्या उद्दिष्टाने शशी कपूर यांनी आपली निर्मिती संस्था काढली. ‘फिल्मवालाज’ असं या संस्थेचं नाव होतं. या बॅनरखाली शशी कपूर यांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि हटके स्वरुपाच्या फिल्म्स बनवल्या. १९७८ साली जुनून ही सरंजामशाही आणि ब्रिटीश साम्राज्य यातील संबंधांवरील सिनेमा त्याने काढला. याशिवाय कलियुग (१९८१), ३६ चौरंगी लेन (१९८१), विजेता (१९८२) आणि उत्सव (१९८४) यांसारखे सिनेमे त्याने काढले. आपला मित्र अमिताभ बच्चन, भाऊ शम्मी कपूर आणि पुतण्या ऋषी कपूर यांना घेऊन शशीने अजूबा हा सिनेमा दिग्दर्शित केला. मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही.
2/8

आंतरराष्ट्रीय कलाकार

धरमपुत्र, प्रेम पत्र, चार दिवारे यांसारख्या सिनेमांत काम केल्यावरही शशी कपूर समाधानी नव्हता. शशी कपूरला नाविन्याचा ध्यास लागला होता. त्यामुळे शशी कपूरने भारताच्या इतिहासात एक अशी गोष्ट केली, की जी त्याच्या व्यतिरिक्त अजतागायत कुणी करू शकलेलं नाही. हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारा शशी कपूर हा पहिला कलाकार ठरला. १९६३ साली शशी कपूरने हॉलिवूड गाजवलं. १९८८ साली ‘द डिसीव्हर’ या सिनेमात शशी कपूरने ‘जेम्स बाँड’ पिअर्स ब्रोस्ननसोबत महत्वाची भूमिका साकारली. हा सिनेमा शशी कपूरच्या कारकीर्दीतील महत्वाचा सिनेमा होता. हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री एलिझाबेथ टेलर हिने आपल्या मृत्यूपूर्वी शशी कपूरच्या नावे पत्र लिहून तो  सर्वांत उत्कृष्ट अभिनेता आणि व्यक्ती असल्याचं म्हटलं होतं.
3/8

स्टाइल

शशी कपूरने आपल्या दिसण्याच्या बाबतीत, स्टाइलमध्ये बरेच वेगवेगळे प्रयोग केले. जुनून सिनेमात सरंजामी डौल त्याने सुंदर रीत्या साकारला. त्याची हेअरस्टाइल आणि हास्य ६०, ७० आणि ८० च्या दशकात लोक कॉपी करू लागले होते.
4/8

विवाह आणि पुढची पीढी

शशी कपूर सिनेमात येण्यापूर्वी कलकत्त्यात नाटकांमध्ये काम करत असे. या काळात शशी कपूर ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर केंडल हिच्या प्रेमात पडला. जिफरचे वडील रॉबर्ट यांनी त्यांच्या विवाहाला विरोध केला होता. तेव्हा शशी कपूरची वहिनी म्हणजेच शम्मी कपूरची पत्नी असणाऱ्या गीता बालीने मध्यस्थी करून शशी आणि जेनिफर यांचं लग्न जमवलं. शशी- जेनिफरला करण आणि कुणाल ही दोन मुलं तर संजना ही मुलगी झाली. १९८४ साली जेनिफर कॅन्सरमुळे जग सोडून गेली. या गोष्टीचा शशी कपूरच्या मनावर खूप मोठा आघात झाला.
5/8

पदार्पण

१९६१ सालच्या ‘धरमपुत्र’ या सिनेमातून शशी कपूरने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या कारकीर्दीत शशी कपूरने ११६ सिनेमांमध्ये काम केलं. ७०च्या दशकातला शशी कपूर हा सर्वाधिक व्यस्त कलाकार मानला जात होता. शशी कपूरने ‘हाऊसहोल्डर’, ‘शेक्सपिअरवाला’ यांसारख्या हॉलिवूडच्या सिनेमांतही काम केले. हे सिनेमे विदेशात यशस्वी ठरले.
6/8

कपूर घराण्याचा वारस

पृथ्वीराज कपूरांचा तिसरा मुलगा बलबीर राज कपूर म्हणजेच शशी कपूर. मोठे भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर यांच्यासह तो देखील पुढे जाऊन सिनेसृष्टीत दाखल झाला. आपल्या वेगळ्या अभिनयाने आणि सुंदर दिसण्याने शशी कपूरने आपली वेगळी छाप सोडली.
7/8

कपूर घराण्यातील सगळी वैशिष्ट्यं असणारे शशी कपूर हे ७०च्या दशकातले अत्यंत गाजलेले अभिनेते होते. वडील पृथ्वीराज कपूर, भाऊ राज आणि शम्मी कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवून जरी शशी कपूर बॉलिवूडमध्ये आले, तरी त्यांना आपला ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. आपला वेगळा मार्ग निवडत शशी कपूर लोकप्रियही झाले आणि थेट हॉलिवूडमध्येही पोहोचले.
8/8