भाजीविक्रेता पोरगा ते घोटाळेबाज... भुजबळांचा प्रवास!

Mar 22, 2016, 12:54 PM IST
1/15

ईडीकडून अटक

६९ वर्षीय भुजबळांना अंमलबजावणी संचलनालयाकडून १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आलीय. २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री पदावर असताना त्यांनी भ्रष्टाचार करून करोडोंची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

ईडीकडून अटक ६९ वर्षीय भुजबळांना अंमलबजावणी संचलनालयाकडून १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आलीय. २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री पदावर असताना त्यांनी भ्रष्टाचार करून करोडोंची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

2/15

अबब... भुजबळांची संपत्ती!

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी छगन भुजबळ यांनी २० कोटी रुपयांची आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांनी आपली मालमत्ता २२ कोटी रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले होते.

पण, ईडीच्या धाडीनंतर मुंबईत १४ घरे, ठाण्यात ५ घरे, पुण्यात १ घर, पुण्यात २.२२ हेक्टर  क्षेत्रात बंगला, नाशिकला ५ बंगले, उज्जैनला ३५० एकर जमीन, लोणावळ्याला ६५ एकर भूखंडावर आलिशान बंगला, भुजबळ वायनरीची ४५० एकर जागा, दाबाडे मालगाव येथे २५० एकर जमीन, इंडोनेशियात खाणी, शंभर कोटी रुपयांच्या दुर्मीळ वस्तू ही सारी अफाट संपत्ती भुजबळ कुटुंबीयांच्या नावे असल्याचं उघड झालं.

अबब... भुजबळांची संपत्ती! २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी छगन भुजबळ यांनी २० कोटी रुपयांची आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांनी आपली मालमत्ता २२ कोटी रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले होते. पण, ईडीच्या धाडीनंतर मुंबईत १४ घरे, ठाण्यात ५ घरे, पुण्यात १ घर, पुण्यात २.२२ हेक्टर  क्षेत्रात बंगला, नाशिकला ५ बंगले, उज्जैनला ३५० एकर जमीन, लोणावळ्याला ६५ एकर भूखंडावर आलिशान बंगला, भुजबळ वायनरीची ४५० एकर जागा, दाबाडे मालगाव येथे २५० एकर जमीन, इंडोनेशियात खाणी, शंभर कोटी रुपयांच्या दुर्मीळ वस्तू ही सारी अफाट संपत्ती भुजबळ कुटुंबीयांच्या नावे असल्याचं उघड झालं.

3/15

बाळासाहेबांना अटक करण्याची आदेश

भुजबळांकडे गृहमंत्रालयाचा कारभारही सोपवण्यात आला होता. यावेळी, त्यांनी एक पाऊल असं उचललं की ज्याचा कुणी कधी विचारही केला नसेल.

बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेच्या मुखपत्रात 'सामना'मध्ये भडकाऊ लेख लिहिण्याचा आरोप होता. यावेळी, भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेला परवानगी दिली. अटकेनंतर काही वेळातच त्यांना जामीन मंजूर झाला. परंतु, एव्हाना भुजबळ पुन्हा एकदा शिवसेनेच्या टार्गेटवर आले होते. 

बाळासाहेबांना अटक करण्याची आदेश भुजबळांकडे गृहमंत्रालयाचा कारभारही सोपवण्यात आला होता. यावेळी, त्यांनी एक पाऊल असं उचललं की ज्याचा कुणी कधी विचारही केला नसेल. बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेच्या मुखपत्रात 'सामना'मध्ये भडकाऊ लेख लिहिण्याचा आरोप होता. यावेळी, भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेला परवानगी दिली. अटकेनंतर काही वेळातच त्यांना जामीन मंजूर झाला. परंतु, एव्हाना भुजबळ पुन्हा एकदा शिवसेनेच्या टार्गेटवर आले होते. 

4/15

राज्याचे उपमुख्यमंत्री

भुजबळ आघाडी सरकारचे पहिले उपमुख्यमंत्री झाले. १९९९ ते २००४ या पंधरा वर्षाच्या काळात भुजबळ सत्ताकारणात होते. या काळात उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. यात गृह, पर्यटन तसंच ज्या खात्यामुळे ते अडचणीत आले ते सार्वजनिक बांधकामे खातेही अनेक वर्ष त्यांच्याकडे होतं. 

राज्याचे उपमुख्यमंत्री भुजबळ आघाडी सरकारचे पहिले उपमुख्यमंत्री झाले. १९९९ ते २००४ या पंधरा वर्षाच्या काळात भुजबळ सत्ताकारणात होते. या काळात उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. यात गृह, पर्यटन तसंच ज्या खात्यामुळे ते अडचणीत आले ते सार्वजनिक बांधकामे खातेही अनेक वर्ष त्यांच्याकडे होतं. 

5/15

राष्ट्रवादीत प्रवेश

साल १९९९ साली शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली तेव्हा भुजबळ त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेले. एव्हाना भुजबळ राज्याच्या राजकारणातील एक लढवय्या नेता अशी त्यांची ओळख झाली होती. शिवसेना खेडय़ापाडय़ात पोहचवण्याचा त्यांना अनुभव होताच. त्याच अनुभवावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवारांनी भुजबळांच्या खांद्यावर दिली. भुजबळांनीही ती जबाबदारी पार पाडली आणि १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली आणि भुजबळांना त्यांचे फळ मिळाले.

राष्ट्रवादीत प्रवेश साल १९९९ साली शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली तेव्हा भुजबळ त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेले. एव्हाना भुजबळ राज्याच्या राजकारणातील एक लढवय्या नेता अशी त्यांची ओळख झाली होती. शिवसेना खेडय़ापाडय़ात पोहचवण्याचा त्यांना अनुभव होताच. त्याच अनुभवावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवारांनी भुजबळांच्या खांद्यावर दिली. भुजबळांनीही ती जबाबदारी पार पाडली आणि १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली आणि भुजबळांना त्यांचे फळ मिळाले.

6/15

मीनाताईंसोबतचं आई-मुलाचं नातं...

शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांवर हल्ला होण्याची भीती होती. त्यामुळेच, १० दिवस नागपूरमध्ये काढावे लागले होते. पण, ही भीती कमी झाली ती मीनाताईंमुळे... ज्यांनी भुजबळांना आपला मुलगा मानलं होतं... छगन भुजबळ यांचं बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताईंसोबत जिव्हाळ्याचं नातं होतं... अगदी आई-मुलासारखं होतं.

शिवसेनेतून बाहेर पडल्यावर बरेच वर्ष बाळासाहेब आणि मीनातार्ईंशी बोलणं झालं नाही... पण, शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांना भुजबळांनी पहिला फोन केला ते श्रीकांत ठाकरेंचं निधन झाल्यावर...  

मीनाताईंसोबतचं आई-मुलाचं नातं... शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांवर हल्ला होण्याची भीती होती. त्यामुळेच, १० दिवस नागपूरमध्ये काढावे लागले होते. पण, ही भीती कमी झाली ती मीनाताईंमुळे... ज्यांनी भुजबळांना आपला मुलगा मानलं होतं... छगन भुजबळ यांचं बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताईंसोबत जिव्हाळ्याचं नातं होतं... अगदी आई-मुलासारखं होतं. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर बरेच वर्ष बाळासाहेब आणि मीनातार्ईंशी बोलणं झालं नाही... पण, शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांना भुजबळांनी पहिला फोन केला ते श्रीकांत ठाकरेंचं निधन झाल्यावर...  

7/15

शिवसेना सोडण्यामागचं खरं कारण... 

शिवसेनेतून बाहेर पडण्यामागचं खरं कारण होतं पक्षाकडून त्यांना साईडलाईन केलं जाणं... २५ वर्ष ज्या पक्षात काम केलं... ज्या पक्षानं मोठं केलं... ज्या पक्षाच्या वाढीसाठी काम केलं... पदरचे पैसे खर्च करून, कर्ज काढून ज्या पक्षाचा प्रचार केला... त्याच पक्षानं विरोधी पक्षनेता निवडायची वेळ आली तेव्हा भुजबळांना बाजुला सारून मनोहर जोशींना पुढे केलं. खुद्द बाळासाहेबांचा हा निर्णय होता. हे भुजबळांना जास्त लागलं.

शिवसेना सोडण्यामागचं खरं कारण...  शिवसेनेतून बाहेर पडण्यामागचं खरं कारण होतं पक्षाकडून त्यांना साईडलाईन केलं जाणं... २५ वर्ष ज्या पक्षात काम केलं... ज्या पक्षानं मोठं केलं... ज्या पक्षाच्या वाढीसाठी काम केलं... पदरचे पैसे खर्च करून, कर्ज काढून ज्या पक्षाचा प्रचार केला... त्याच पक्षानं विरोधी पक्षनेता निवडायची वेळ आली तेव्हा भुजबळांना बाजुला सारून मनोहर जोशींना पुढे केलं. खुद्द बाळासाहेबांचा हा निर्णय होता. हे भुजबळांना जास्त लागलं.

8/15

शिवसेना सोडली

तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली. मंडल आयोगाच्या शिफारसींचे स्वागत केल्यामुळे सेनेत सापत्निक वागणूक मिळू लागल्याने सेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि १८ आमदारांसह शिवसेना सोडली. शिवसेना ओबीसी आरक्षणाचा विरोध करतेय, असं सांगत ते १९९१ मध्ये पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला ओबीसी नेत्याच्या रुपात सादर केलं. 

शिवसेना सोडली तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली. मंडल आयोगाच्या शिफारसींचे स्वागत केल्यामुळे सेनेत सापत्निक वागणूक मिळू लागल्याने सेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि १८ आमदारांसह शिवसेना सोडली. शिवसेना ओबीसी आरक्षणाचा विरोध करतेय, असं सांगत ते १९९१ मध्ये पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला ओबीसी नेत्याच्या रुपात सादर केलं. 

9/15

विधानसभेवर निवड

१९८५ आणि १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून भुजबळ विधानसभेवर निवडून गेले. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत ते मंत्री होते. पुढे एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद ही भूषविले.

विधानसभेवर निवड १९८५ आणि १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून भुजबळ विधानसभेवर निवडून गेले. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत ते मंत्री होते. पुढे एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद ही भूषविले.

10/15

वेषांतर करून कर्नाटकात प्रवेश

त्यावेळी कर्नाटक प्रवेश मिळावा म्हणून भुजबळ आयांनी शक्कल लढवली. त्यांनी पांडे नावाचा हिंदी पत्रकार बनून कुर्ता पायजमा आणि गळ्यात शबनम बॅग अडकवून बाळासाहेबांना भेटायला गेले. तेव्हा कोणी आत सोडायला तयार नाही हे पाहून त्यांनी आपली ओळख कानात सांगितली. खुद्द बाळासाहेबांनीही त्यांना ओळखलं नव्हतं.

नारायण आठवले आणि तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्या सोबत होते. प्रमोद नलावडे नावाच्या वेशभूषाकाराने त्यांना शेख इक्बाल बनवले. सुटाबुटात आणि हातात पाईप घेऊन शेख अब्दुल्ला हे नाव धारण करून हातात पाईप घेऊन 'शेख' बनून त्यांनी बेळगावात प्रवेश मिळवला. तर तेथे गुजराती व्यापाऱ्याच्या घरात आश्रय घेतला. त्यावेळी भुजबळ म्हणून त्यावेळी कोणीही ओळखले नाही. बेळगावात मोठे आंदोलन झाले. अनेकांची डोकी फुटली. आंदोलनकर्त्यांना धारवाडच्या जेलमध्ये टाकण्यात आले. यावेळी शिवसेना नेता म्हणून भुजबळ दीड महिना जेलमध्ये होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या इतिहासात अविभाज्य स्थान असलेल्या या सीमा आंदोलनात भुजबळ यांना नेतफत्व करण्याची संधी मिळाली होती.

वेषांतर करून कर्नाटकात प्रवेश त्यावेळी कर्नाटक प्रवेश मिळावा म्हणून भुजबळ आयांनी शक्कल लढवली. त्यांनी पांडे नावाचा हिंदी पत्रकार बनून कुर्ता पायजमा आणि गळ्यात शबनम बॅग अडकवून बाळासाहेबांना भेटायला गेले. तेव्हा कोणी आत सोडायला तयार नाही हे पाहून त्यांनी आपली ओळख कानात सांगितली. खुद्द बाळासाहेबांनीही त्यांना ओळखलं नव्हतं. नारायण आठवले आणि तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्या सोबत होते. प्रमोद नलावडे नावाच्या वेशभूषाकाराने त्यांना शेख इक्बाल बनवले. सुटाबुटात आणि हातात पाईप घेऊन शेख अब्दुल्ला हे नाव धारण करून हातात पाईप घेऊन 'शेख' बनून त्यांनी बेळगावात प्रवेश मिळवला. तर तेथे गुजराती व्यापाऱ्याच्या घरात आश्रय घेतला. त्यावेळी भुजबळ म्हणून त्यावेळी कोणीही ओळखले नाही. बेळगावात मोठे आंदोलन झाले. अनेकांची डोकी फुटली. आंदोलनकर्त्यांना धारवाडच्या जेलमध्ये टाकण्यात आले. यावेळी शिवसेना नेता म्हणून भुजबळ दीड महिना जेलमध्ये होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या इतिहासात अविभाज्य स्थान असलेल्या या सीमा आंदोलनात भुजबळ यांना नेतफत्व करण्याची संधी मिळाली होती.

11/15

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद

साल १९६९ च्यावेळी ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद आंदोलनात सहभागी झाले. बेळगांव - कारवार महाराष्ट्राला मिळावं म्हणून मोठं आंदोलन झालं होतं. मोरारजी देसाईंनी त्यावेळी कडक भूमिका घेतली होती तर यामध्ये शिवसेना नेता म्हणून भुजबळांना पहिल्याच दिवशी अटक झाली व सुटकाही झाली होती. मात्र, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. 

पुढे मुंबई पेटली, जाळपोळ सुरू झाली. लोक भयंकर चिडले होते. बाळासाहेब ठाकरेंनादेखील अटक झाली. तीन महिने बाळासाहेब तुरूंगात होते. नंतर १९८७ साली बेळगाव प्रश्नी झालेल्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरे, एस.एम.जोशी, एन.डी.पाटील, शरद पवार यांनी बेळगावात सत्याग्रह करावयचे ठरविले. तर यासाठी शिवसेनेच्या दुसऱ्या फळीचं नेतृत्व छगन भुजबळ करतील, असं ठरलं. कर्नाटकात हे समजताच भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेऊ देणार नाही, असे जाहीर झालं होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद साल १९६९ च्यावेळी ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद आंदोलनात सहभागी झाले. बेळगांव - कारवार महाराष्ट्राला मिळावं म्हणून मोठं आंदोलन झालं होतं. मोरारजी देसाईंनी त्यावेळी कडक भूमिका घेतली होती तर यामध्ये शिवसेना नेता म्हणून भुजबळांना पहिल्याच दिवशी अटक झाली व सुटकाही झाली होती. मात्र, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले.  पुढे मुंबई पेटली, जाळपोळ सुरू झाली. लोक भयंकर चिडले होते. बाळासाहेब ठाकरेंनादेखील अटक झाली. तीन महिने बाळासाहेब तुरूंगात होते. नंतर १९८७ साली बेळगाव प्रश्नी झालेल्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरे, एस.एम.जोशी, एन.डी.पाटील, शरद पवार यांनी बेळगावात सत्याग्रह करावयचे ठरविले. तर यासाठी शिवसेनेच्या दुसऱ्या फळीचं नेतृत्व छगन भुजबळ करतील, असं ठरलं. कर्नाटकात हे समजताच भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेऊ देणार नाही, असे जाहीर झालं होते.

12/15

शिवसेनेत प्रवेश

इंजिनिअरींगचे विद्यार्थी असताना भुजबळांनी शिवाजी पार्कवर शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं एक भाषण ऐकलं... आणि ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.  १९६८ साली ते कृतीशील शिवसैनिक बनले. १९७३ साली नगरचे नगरसेवक त्यानंतर तब्बल दोन वेळा मुंबई महापलिका महपौर बनण्याचा मान मिळविला आहे. बॉम्बेचं नामकरण मुंबई केलं ते भुजबळ महापौर असतानाच...

शिवसेनेत प्रवेश इंजिनिअरींगचे विद्यार्थी असताना भुजबळांनी शिवाजी पार्कवर शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचं एक भाषण ऐकलं... आणि ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.  १९६८ साली ते कृतीशील शिवसैनिक बनले. १९७३ साली नगरचे नगरसेवक त्यानंतर तब्बल दोन वेळा मुंबई महापलिका महपौर बनण्याचा मान मिळविला आहे. बॉम्बेचं नामकरण मुंबई केलं ते भुजबळ महापौर असतानाच...

13/15

शिक्षण

माझलगावमध्येच भुजबळांचं शिक्षण तिथल्या महापालिकेचे शाळेत झाले. आठवी नंतरचे शिक्षण त्यांनी एलफिन्स्टन टेक्निकल विद्यालयात घेतले. तर अभियांत्रिकी शिक्षण व्हीजेटीआय मधून पूर्ण केलं.

शिक्षण माझलगावमध्येच भुजबळांचं शिक्षण तिथल्या महापालिकेचे शाळेत झाले. आठवी नंतरचे शिक्षण त्यांनी एलफिन्स्टन टेक्निकल विद्यालयात घेतले. तर अभियांत्रिकी शिक्षण व्हीजेटीआय मधून पूर्ण केलं.

14/15

बालपणीचे दिवस

छगन चंद्रकांत भुजबळ असं त्यांचं पूर्ण नाव... त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९४७ रोजी नाशिकमधल्या सामान्य कुटुंबात झाला. दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या आईच्या काकूनं (आजी)ने आणि त्यांच्या मावशीने सांभाळ केला. ते माझलगावच्या भाजीपाला वाडीत रहात होते. माळी जातीत जन्मल्यामुळे त्याच्या अवतीभवती नेहमी भाजीपाला आणि बाग बगीचा असंच वातावरण होतं. आपल्या दोन भावांसोबत आणि मावशीसोबत ते माझगावच्या घराच्या बाहेर भाजी विकत होते. 

बालपणीचे दिवस छगन चंद्रकांत भुजबळ असं त्यांचं पूर्ण नाव... त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९४७ रोजी नाशिकमधल्या सामान्य कुटुंबात झाला. दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या आईच्या काकूनं (आजी)ने आणि त्यांच्या मावशीने सांभाळ केला. ते माझलगावच्या भाजीपाला वाडीत रहात होते. माळी जातीत जन्मल्यामुळे त्याच्या अवतीभवती नेहमी भाजीपाला आणि बाग बगीचा असंच वातावरण होतं. आपल्या दोन भावांसोबत आणि मावशीसोबत ते माझगावच्या घराच्या बाहेर भाजी विकत होते. 

15/15

सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बालपणी भाजी विकून आपला उदरनिर्वाह करत होते, हे ज्यांना माहित नसेल त्यांनी भुजबळांचा 'भाजीविक्रेता पोरगा ते घोटाळेबाज' हा प्रवास जरुर माहीत करून घेण्यासारखाच आहे... 

सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बालपणी भाजी विकून आपला उदरनिर्वाह करत होते, हे ज्यांना माहित नसेल त्यांनी भुजबळांचा 'भाजीविक्रेता पोरगा ते घोटाळेबाज' हा प्रवास जरुर माहीत करून घेण्यासारखाच आहे...