या मंदिराला ११ प्रदक्षिणा मारल्यानंतर पूर्ण होतात सर्व इच्छा

पाहा कोठे आहे हे मंदिर

शैलेश मुसळे | Updated: Apr 17, 2018, 10:44 AM IST
या मंदिराला ११ प्रदक्षिणा मारल्यानंतर पूर्ण होतात सर्व इच्छा title=

मुंबई : देशात अनेक धार्मिक स्थळं आहेत. प्रत्येक जागेची एक वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहेत. अनेक लोकांमध्ये धार्मिक स्थळाबाबत श्रद्धा असते. असंच एक धार्मिक स्थळ आहे ज्याबाबत तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. 'वीजा टेंपल' असं य़ा धार्मिक स्थळाचं नाव आहे. या स्थळाबाबत मान्यता आहे की, येथे नारळ चढवल्यानंतर वीजा सहज मिळून जातो. भगवान बालाजीच्या या मंदिरात लांबून लांबून लोकं दर्शनासाठी येतात.

हैदराबादपासून जवळपास 40 किलोमीटर दूर असलेल्या ओसमान सागर नदी किनारी हे मंदिर आहे. या मंदिराला ११ प्रदक्षिणा घातल्यानंतर इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिराला कृतज्ञता म्हणून 108 प्रदक्षिणा घातल्या जातात. ५०० वर्ष जुन्या मंदिराचा हा इतिहास आहे. यामुळेच याला वीजा टेम्पल म्हंटलं जातं. 

Image result for visa temple zee

असं म्हटलं जातं की, खूप वर्षांपूर्वी एक भक्त येथे वीजा मिळावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी आला होता. त्यानंतर त्याची इच्छा पूर्ण झाली. ही गोष्ट स्थानिकांमध्ये पसरली. त्यानंतर वीजा मिळण्यासाठी लोकं येथे प्रार्थना करण्यासाठी येतात. या मंदिराला दर आठवड्याला ७५००० ते १००००० भक्त येतात. अनाकोटा, ब्रहृमोत्सव आणि पूलंग सारख्या उत्सवादरम्यान ही संख्या २ लाखांच्या वर जाते. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पण येथे कोणती दानपेटी ही नाही आणि कोणती व्हीआयपी सिस्टीम देखील नाही.

Image result for visa temple