अखुरथ संकष्टी चतुर्थीची पूजा, विधी आणि वेळ जाणून घ्या, 2023 मधील शेवटची संकष्टी चतुर्थी

Akhuratha Sankashti Chaturthi 2023: आज अखुरथ संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीची विधी, वेळ आणि पूजा जाणून घ्या.  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 30, 2023, 11:27 AM IST
अखुरथ संकष्टी चतुर्थीची पूजा, विधी आणि वेळ जाणून घ्या, 2023 मधील शेवटची संकष्टी चतुर्थी title=

Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचागानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. तसेच रात्री चंद्र देवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते.  आणि यानंतर व्रत सोडला जातो. चतुर्थी तिथीचे व्रत करून श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असा विश्वास आहे. गणेश पुराणानुसार अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अशा परिस्थितीत, अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023 च्या पूजेची तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया.

नेमकी तारीख कोणती?

पंचांगानुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शनिवार, 30 डिसेंबर रोजी सकाळी 9.43 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारी, 31 डिसेंबर रोजी सकाळी 11.55 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीमुळे अखुरथ संकष्टी चतुर्थी ३० डिसेंबरलाच साजरी होणार आहे.

अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023 तारीख

पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 09.43 पासून सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:55 वाजता संपेल. अशा स्थितीत पौष महिन्यातील अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत 30 डिसेंबर 2023 रोजी पाळण्यात येणार आहे.

अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023 मुहूर्त

पूजा मुहूर्त- सकाळी 08:03 ते 09:30 पर्यंत
संध्याकाळची वेळ - संध्याकाळी 06:14 ते 07:46 पर्यंत
चंद्रोदयाची वेळ- रात्री 09:10 वा

संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत

  • अखुरथ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास या दिवशी हिरवे कपडे घाला.
  • आंघोळ करून उपवासाची प्रतिज्ञा करून श्रीगणेशाची आराधना सुरू करावी.
  • पूजा करण्यापूर्वी श्रीगणेशाची मूर्ती स्वच्छ करून कपाळावर तीळ लावा.
  • त्यानंतर पूजा साहित्याने पूजा व्यवस्थित करावी.
  • लक्षात ठेवा की, दुर्वा आणि लाडू पूजा साहित्याचा भाग म्हणून अर्पण केले पाहिजेत.
  • संध्याकाळी चंद्र उगवल्यावर त्याला अर्घ्य द्यावे आणि गणेशाची पूजा व पठण करून श्रीगणेशाचा आशीर्वाद घ्या.

संकष्टी चतुर्थीच्या गणेश पूजेचे महत्व

श्रीगणेशाला शास्त्रात अडथळे दूर करणारे म्हटले आहे. त्यांची पूजा केल्याने मानवी जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होतात. जो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र श्री गणेशाचे खऱ्या मनाने ध्यान करतो, त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात आणि त्याच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी येते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)