Shukra Gochar 2022: शुक्राची या 5 राशींच्या लोकांवर मोठी कृपा, 11 नोव्हेंबरपासून बदलेल आयुष्य!

Venus Transit November 2022: संपत्ती, प्रेम, सौंदर्य आणि आनंद देणारा ग्रह शुक्र 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 5 राशींसाठी शुक्र गोचर खूप शुभ राहील. 

Updated: Nov 1, 2022, 01:22 PM IST
Shukra Gochar 2022: शुक्राची या 5 राशींच्या लोकांवर मोठी कृपा, 11 नोव्हेंबरपासून बदलेल आयुष्य! title=

Shukra Gochar November 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 11 नोव्हेंबरला शुक्र ग्रह राशी बदलत आहे. शुक्र गोचर झाल्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रह संपत्ती, समृद्धी, वैभव, प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. शुक्र सध्या तूळ राशीत आहे. वृश्चिक राशीतील शुक्राचे संक्रमण 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. शुक्राच्या कृपेने या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल, जीवनात सुख-विलास वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. 

सिंह: शुक्र गोचर सिंह राशीच्या लोकांना मोठे लाभ देईल. शुक्राचे राशीत बदल होताच या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढू शकते. नवीन काम सुरु करु शकता. व्यवसायात लाभ होईल. नफा वाढेल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. 

तुळ : शुक्राच्या राशीतील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. त्यांना अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. या महिन्यात बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कर्जमुक्ती मिळेल. 

धनु : शुक्राच्या राशीतील बदल धनु राशीच्या लोकांसाठीही अनुकूल राहील. व्यवसायात लाभ होईल. करिअरसाठीही हा काळ चांगला राहील. उत्पन्न वाढेल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. लव्ह लाईफ, वैवाहिक जीवनासाठी काळ चांगला आहे. 

मकर : शुक्राचे राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. पगार वाढू शकतो. पदोन्नती मिळू शकते. तुमच्याबद्दल आदर वाढेल. धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जीवनात आनंद वाढेल. 

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर चांगले राहील. करिअरमध्ये यश मिळेल. मोठे यश मिळू शकते. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. पगारवाढ, बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठीही वेळ उत्तम आहे. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)