Horoscope 5 September 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी वादांपासून दूर राहणं आवश्यक आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

सुरभि जगदीश | Updated: Sep 5, 2023, 12:40 AM IST
Horoscope 5 September 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी वादांपासून दूर राहणं आवश्यक आहे! title=

Horoscope 5 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. संयम ठेवून वाटचाल करावी.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. नोकरीत तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आपल्या व्यसनांवर आवर घाला.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. नोकरीत बदल किंवा बढतीचे प्रबल योग आहेत.   

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी कला क्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ व मानसन्मान प्राप्त होईल. नोकरी व्यवसायात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी महत्वाची कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. घरातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्याने मन प्रसन्न राहील. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांसोबतचा कोणताही तणाव आज संपुष्टात येईल. वादांपासून दूर राहून आरोग्याबाबत जागरूक राहावे.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींनी रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जीवनात तसेच इतर क्षेत्रात तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.  

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. व्यवसायातील पूर्वीची ओळख आणि संपर्क तुम्हाला करार मिळवून देऊ शकतात.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबात तुम्हाला वडील आणि वरिष्ठांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी धर्म-कार्य आणि अध्यात्मिक विषयात रुची राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस महागात पडू शकतो.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी कोणताही व्यवसाय भागीदारीत केला असेल तर नक्कीच नफा देईल. नोकरदार लोकांना आज चांगली संधी मिळू शकते. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एखादी कल्पना सुचली असेल तर ती लगेच पुढे करावी. काही नवीन काम करण्यासाठी वेळ लागेल. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )