Diwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त

Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...यंदा 2 भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी असणार आहे. प्रकाशाच्या उत्सवाला नक्की कधीपासून सुरुवात होणार जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त 

नेहा चौधरी | Updated: Nov 5, 2023, 08:40 PM IST
Diwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त title=
Diwali 2023 this year diwali is seven days diwali festival dates and shubh muhurat know the details in marathi

Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी... प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू पचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा हा उत्साह पाच दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा भाकड दिवसामुळे दिवाळी सात दिवसांची आली आहे. 11 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला कुठलाही सण नसल्यामुळे या दिवसाला भाकड दिवस असं म्हटलं जातं. त्यामुळे यंदा दिवाळी 9 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. वसुबारपासून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे ? जाणून घेऊयात तिथी आणि शुभ मुहूर्त. (Diwali 2023 this year diwali is seven days diwali festival dates and shubh muhurat know the details in marathi)

वसुबारस कधी आहे ? (Vasubaras 2023)

दिवाळीच्या पहिला दिवस म्हणजे वसुबारस...या दिवशी गाई वासराची पूजा करण्यात येतं. त्यांना गोडाधोडाचं नैवेद्य अर्पण करण्यात येतं. पंचांगानुसार वसुबारसचा सण 9 नोव्हेंबरला येत्या गुरुवारपासून असणार आहे. या दिवशी द्वादशी एकादशीसोबत वैधृति योग आहे. 

धनत्रयोदशी कधी आहे ? (Dhanteras 2023)

दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला येत्या शुक्रवारी असणार आहे. यादिवशी कुबेर देव, धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्यात येते. हा दिवश खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असा हा दिवस लोक यादिवशी सोने चांदीसह गाडी घर, मालमत्ता आणि भांड्यांची खरेदी करतात. 

धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त -  5 वाजून 47 मिनिटांपासून 7 वाजून 43 मिनिटांपर्यंत

धनत्रयोदशीला खरेदी करण्याची वेळ - दुपारी 12.35 ते 11 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 01.57 वाजेपर्यंत 

हेसुद्धा वाचा - Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

नरक चतुर्दशी किंवा पहिली आंघोळ कधी आहे ? (Narak Chaturdashi 2023)

यंदा नरक चतुर्दशी किंवा दिवाळीची पहिली आंघोळ 12 नोव्हेंबरला रविवारी असणार आहे. तसं तर पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथीला 11 नोव्हेंबरला दुपारी 1.57 पासून सुरु होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 12 नोव्हेंबरला दुपारी 2.44 वाजेपर्यंत असणार आहे. यादिवशी पहाटे उठून उटणं तेल लावून अभ्यंगस्नान केलं जातं. त्यानंतर नवीन कपडे घालून फराळ करण्यात येतो. 

नरक चतुदर्शीचा शुभ मुहूर्त - संध्याकाळी 5.31 मिनिटांपासून 8.36 मिनिटांपर्यंत

लक्ष्मीपूजन कधी आहे ? (Diwali 2023 Lakshmi Puja)

यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. याचा अर्थ लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरला रविवारी असणार आहे. यादिवशी माता लक्ष्मीसोबत गपतीची पूजा केली जाते. घरात सुख समृद्धीसोबत धनासाठी पूजा करण्यात येते. 

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त - संध्याकाळी 5.31 मिनिटांपासून 8.36 मिनिटांपर्यंत

बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा कधी आहे ? (Diwali Padwa 2023)

सहसा लक्ष्मीपूजना झालं की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ असतो. यादिवशी पत्नी पतीला ओवाळून त्याच्या दीर्घयुष्याची कामना करते. हा सण 14 नोव्हेंबरला मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. व्यापारी यादिवशी नवीन वर्षांची सुरुवात करतात. यादिवशी चोपडी पूजा करण्यात येते. 

दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त - संध्याकाळी 6.14 ते 8.35 मिनिटांपर्यंत 

भाऊबीज कधी आहे ? (Bhai Dooj 2023)

भाऊबीजचा सण हा बहीण-भावासाठी अतिशय जिव्हाळ्याचा असतो. हा सण बहीण आणि भावाच्या नात्याल समर्पित केलेला आहे. हा सण 15 नोव्हेंबरला बुधवारी साजरा करण्यात येणार आहे. भाऊबीजेचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येतो. 

 भाऊबीजेचा शुभ मुहूर्त - दुपारी 1 वाजून 10 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 22 मिनिटांपर्यंत 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)