रविवारी चुकूनही करू नका 'या' गोष्टींची खरेदी, घरात राहिल पैशांची तंगी

रविवारी काम करताना काही गोष्टींचा विचार करा 

Updated: Dec 19, 2021, 10:40 AM IST
रविवारी चुकूनही करू नका 'या' गोष्टींची खरेदी, घरात राहिल पैशांची तंगी  title=

मुंबई : रविवार हा सूर्याची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी रविवारी विशेष उपाय देखील केले जातात. याशिवाय सूर्यदेवाची कृपा मिळविण्यासाठी या दिवशी उपवास केल्याने फायदा होतो, असे मानले जाते. सहसा रविवारी सुट्टी असते. बहुतेक लोकांना या दिवशी खरेदी करायला आवडते. पण ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी काही वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे.

रविवारी या गोष्टी खरेदी करणं अशुभ 

बहुतेक लोकांना रविवारी खरेदी करायला आवडते. पण ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी लोखंडी वस्तू खरेदी करणे अशुभ आहे. ते खरेदी केल्याने आर्थिक नुकसान होते. सोबतच देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. याशिवाय हार्डवेअर, कारचे सामान, फर्निचर, घर बनवण्याच्या वस्तू आणि बागकामाच्या वस्तूही या दिवशी खरेदी करू नयेत.

रविवारच्या दिवशी या गोष्टी न करण्यावर बंदी 

रविवारी मीठ खाऊ नये. कारण त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. यासोबतच कामात अडथळे येत आहेत. रविवारी काळे, निळे, तपकिरी आणि राखाडी रंगाचे कपडे घालू नयेत. रविवारी तांब्याच्या वस्तू विकू नयेत. रविवारी केस कापल्याने कुंडलीतील सूर्य कमजोर होतो.

त्यामुळे रविवारी केस कापणे टाळावेत. याशिवाय रविवारी मांस आणि मद्य सेवन करू नये. असे मानले जाते की या दिवशी शनिशी संबंधित गोष्टींचे सेवन करू नये. दुसरीकडे रविवारी लाल रंगाच्या वस्तू, पाकीट, कात्री, गहू इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की रविवारी या वस्तू खरेदी केल्याने घरात समृद्धी येते.