Durva: गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाचे प्रभावी तोडगे, ज्योतिषशास्त्रानुसार उपाय जाणून घ्या

Durva Upay: हिंदू धर्मात गणपती आराध्य दैवत आहे. कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचं पूजन केलं जातं. गणपतीला प्रिय असलेला दुर्वा मोठ्या भक्तिभावाने वाहिला जातो. दुर्वा वाहिल्याने गणपती प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतो, अशी मान्यता आहे. 

Updated: Jan 11, 2023, 12:56 PM IST
Durva: गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाचे प्रभावी तोडगे, ज्योतिषशास्त्रानुसार उपाय जाणून घ्या title=

Durva Upay: हिंदू धर्मात गणपती आराध्य दैवत आहे. कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचं पूजन केलं जातं. गणपतीला प्रिय असलेला दुर्वा मोठ्या भक्तिभावाने वाहिला जातो. दुर्वा वाहिल्याने गणपती प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतो, अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार दुर्वाविना गणपतीचं पूजन अपूर्ण ठरतं. दूर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा दु:ख दूर करतो. दुर्वाचं महत्त्व यावरूनच अधोरेखित होतं. पुरणातही दुर्वाचे महत्त्व सांगण्यात आलं आहे. ज्योतिषशास्त्रात दुर्वाचे काही तोडगे सांगण्यात आले आहेत. या उपयांमुळे जीवनातील संकट सौम्य तसेच दूर होतात. चला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रातील उपाय...

दुर्वाचे ज्योतिषीय उपाय

  • ज्योतिषशास्त्रानुसार चांगलं उत्पन्न असूनही हातात पैसे टिकत नसतील तर शुभ मुहूर्त किंवा चतुर्थीला हा उपाय करावा. दुर्वाचे 11 जुड्या गणपती बाप्पांना अर्पण कराव्यात. या तोडग्यामुळे लवकर लाभ मिळतो. 
  • मनातील इच्छा पूर्ण करण्याची धडपड सुरु असेल आणि यश मिळत नसेल ज्योतिषशास्त्रात उपाय देण्यात आला आहे. गायीच्या दुधात दुर्वा टाकून त्याचा लेप करावा. नियमितपणे कपाळावर टिळक लावावा. यामुळे निश्चित लाभ मिळतो असं सांगण्यात आलं आहे.
  • आर्थिक अडचण असल्यास ज्योतिषशास्त्रात दुर्वाचे काही तोडगे सांगितले आहेत. बुधवारी गणपतीला 11 किंवा 21 जुड्या दुर्वा अर्पण कराव्यात. यामुळे गणपतीची कृपा प्राप्त होते. 
  • जर तुमच्या कुंडलीत बुध कमकुवत किंवा अशुभ अवस्थेत असेल तर बुधवारी दुर्वा तोडगा वापरा. बुधवारी गणपतीला दुर्वा वाहिल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते. तसेच बुध दोषातून मुक्ती मिळते.

बातमी वाचा- Astro: सकाळी बेडवरुन उठल्या उठल्या करा 'या' मंत्राचा जप, संपूर्ण दिवस जाणार मजेत

  • घरात सुख-शांती नांदावी असं वाटत असल्यास बुधवारी गायीला दुर्वा खाण्यास द्यावा. यामुळे गोमातासोबत गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
  • गणपतीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर पूजा विधीस सुरुवात करा. सर्वात आधी गणपतीला दुर्वा अर्पण करा. गणपतीच्या मस्तकावर दुर्वा अर्पण करावा. पायावर चुकूनही दुर्वा अर्पण करू नये. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)