Gajakesari Yog : गुरु-चंद्र एकाच राशीत आल्याने बनला गजकेसरी योग; 'या' राशींचे वाईट दिवस झाले सुरु

Gajakesari Yog : गजकेसरी योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली योगांपैकी एक आहे. गुरु आणि चंद्र एकमेकांच्या संयोगाने किंवा थेट एकमेकांकडे पाहतात तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 3, 2023, 08:50 PM IST
Gajakesari Yog : गुरु-चंद्र एकाच राशीत आल्याने बनला गजकेसरी योग; 'या' राशींचे वाईट दिवस झाले सुरु title=

Gajakesari Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेला राशी बदल करतात. चंद्र आणि बृहस्पति संयोगाने एकत्र येतात तेव्हा एक अतिशय महत्त्वाची घटना घडते. मंगळाच्या अधिपत्याखाली चंद्र मेष राशीत भ्रमण करतोय. तर रविवारी 03 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:38 वाजता बृहस्पति चंद्रासोबत 180 अंशाचा परस्पर पैलू सामायिक झाला आहे. 

गजकेसरी योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात शक्तिशाली योगांपैकी एक आहे. गुरु आणि चंद्र एकमेकांच्या संयोगाने किंवा थेट एकमेकांकडे पाहतात तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग असतो ते अत्यंत बुद्धिमान, आदरणीय, करिअरमध्ये उंची गाठतात. मात्र या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना सावध रहावं लागणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग शुभ परिणाम देण्याऐवजी तुमच्यासाठी अडचणी निर्माण करणारा असेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमचं वैवाहिक जीवन तुटू शकते. तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी चौथ्या भावात आणि दहाव्या भावात गजकेसरी योग तयार झाला आहे. या योगामुळे व्यावसायिक जीवनात एकूणच अस्थिरता येऊ शकते. नोकरीमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. काही  परिस्थितीमुळे तुम्हाला तुमची नोकरीही गमवावी लागू शकते. या काळात तुमचं आरोग्य बिघडण्याची अधिक शक्यता आहे. 

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग चांगलं फळ देणार नाही. हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप कठीण असेल. कुटुंबाशी संबंधित कायदेशीर समस्या आणि आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. काही जीवघेण्या आजारांनाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद विवाद होऊ शकतात. यावेळी कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )