Guru Pushya Yoga 2023 : 12 वर्षांनंतर गुरु पुष्य योगाच्या दिवशी विशेष योग, 'या' राशींना बनवणार कोट्याधीश?

Guru Pushya Yoga 2023 : आजच्या गुरुपुष्यामृत योगाला अतिशय दुर्मिळ आणि खास योग जुळून आला आहे. हा दुर्मिळ योग तब्बल 12 वर्षांनी आला असून या राशींचं नशीब पालटणार आहे.

Updated: Apr 26, 2023, 11:59 PM IST
Guru Pushya Yoga 2023 : 12 वर्षांनंतर गुरु पुष्य योगाच्या दिवशी विशेष योग, 'या' राशींना बनवणार कोट्याधीश? title=
guru pushya amrit yog 2023 Guru uday 2023 these zodiac signs get money

Guru Pushya Yoga 2023 in marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीचा आपल्या आयुष्यावर शुभ किंवा वाईट परिणाम दिसून येतो. 27 नक्षत्रापैकी एक पुष्य नक्षत्र योग गुरुवारी (27 April 2023) आल्यामुळे गुरु पुष्य योग जुळून आला आहे. त्याशिवाय यासोबत तब्बल 12 वर्षांनी अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. गुरु गोचरसह गुरुगुष्यामृत योगामुळे काही राशींचं नशिबात आर्थिक लाभ आहे.  घ्या. (guru pushya amrit yog 2023 Guru uday 2023 these zodiac signs get money) आज गुरु पुष्यमृत योगामध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून. 

मेष (Aries)

गुरुपुष्यामृत योग आणि गुरु उदयामुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. ऑफिसमध्ये आतापर्यंत केले कामाचं फळ मिळणार आहे. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे. पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी आहे. कुटुंबात शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. 

तूळ (Libra)

गुरुपुष्यामृत योग आणि गुरु उदयामुळे या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना आर्थिक लाभासह त्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नातेसंबंध मजबूत करणारा काळ ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना हा काळ शुभ ठरणार आहे. करिअरसाठी हा काळ सर्वोत्तम ठरणार आहे. सरकारी नोकरीची संधी चालून येईल. आर्थिक लाभासोबतच शुभ कार्य ठरणार आहे. जुन्या आजारातून तुमची सुटका होणार आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालविणार आहात. 

मकर (Capricorn)

या राशीसाठी हा योग भाग्यशाली ठरणार आहे. भौतिक सुखासोबत आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रत्येक कामात यश मिळले. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)