हिंदू नववर्षाला 30 वर्षांनंतर बनतोय शुभ योगायोग, या राशींचा 'सुवर्णकाळ' होणार सुरु

Hindu Nav Varsh 2024: ज्योतिषीय गणनेनुसार सुमारे 30 वर्षांनी नवीन वर्षात शुभ राजयोग तयार होणार आहे. यावेळी 9 एप्रिल रोजी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग तयार होणार आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 28, 2024, 07:35 AM IST
हिंदू नववर्षाला 30 वर्षांनंतर बनतोय शुभ योगायोग, या राशींचा 'सुवर्णकाळ' होणार सुरु title=

Hindu Nav Varsh 2024: 1 जानेवारीपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र वैदिक दिनदर्शिकेनुसार, 9 एप्रिलपासून हिंदू नववर्ष 2081 सुरू होतंय. हे ज्योतिष शास्त्रासाठी खूप महत्वाचं असणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार सुमारे 30 वर्षांनी नवीन वर्षात शुभ राजयोग तयार होणार आहे. यावेळी 9 एप्रिल रोजी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग तयार होणार आहेत. 

शिवाय या दिवशी रेवती आणि अश्विनी नक्षत्रही असणार आहेत. ज्योतिषांच्या मते, हिंदू नववर्षानिमित्त घडणारे हे शुभ संयोग 3 राशींसाठी लाभाचे संकेत देत आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे, ते पाहूयात.

वृषभ रास 

नोकरीशी संबंधित समस्या दूर होऊ शकणार आहेत. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. तुमच्या आर्थिक जीवनाला चालना मिळेल. खर्चाशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आराम मिळणार आहे. पदोन्नती आणि पगारवाढ होईल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ दिसू शकते.तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल.

मिथुन रास

तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. घरी काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. नवीन वर्ष व्यावसायिकांसाठी खूप शुभ असणार आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण झाल्यास तुम्ही आनंदी होणार आहात.  तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता.

धनु रास

उत्साह आणि मनोबलाने केलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक आघाडीवर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तसंच या काळात तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल. या वर्षी तुमचे खर्चही कमी होतील आणि पैसे जमा करणेही सोपे होईल. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होईल. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )