Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी! होळीच्या अग्नित नैवेद्य म्हणून पुरणपोळी का अर्पण करतात? त्यामागे आहे 'ही' पारंपरिक गोष्ट

Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी, असं वाक्य आहे. होळी म्हटलं की, महाराष्ट्रीयन घरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य होलिका दहनात अर्पण केला जातो. पण यामागील कारण आणि कथा तुम्हाला माहिती आहे का?

नेहा चौधरी | Updated: Mar 18, 2024, 12:10 PM IST
Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी! होळीच्या अग्नित नैवेद्य म्हणून पुरणपोळी का अर्पण करतात? त्यामागे आहे 'ही' पारंपरिक गोष्ट title=
Holi 2024 Why Puranpoli is offered on holika dahan Behind it is this traditional thing

Holi 2024 : अख्खा देश जाती धर्म, उच्चनीच विसरून एकाच रंगात रंगतो तो म्हणजे होळीचा सण. देशभरात होळीचा उत्साह वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करतात. होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. आपल्यामधील वाईट गोष्टींचं दहन करुन सकारात्मक प्रवृत्त निर्माण केली जाते. महाराष्ट्रात एक वाक्य आहे जे होळीमध्ये म्हटलं जातं. होळी रे होळी पुरणाची पोळी....महाराष्ट्रीय घरांमध्ये होळीला पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केलं जातं. तेव्हा होलिकेला पुरण पोळीचं नैवेद्य का दाखवलं जातं. काय आहे यामागील कथा. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? (Holi 2024 Why Puranpoli is offered on holika dahan Behind it is this traditional thing)

होळीच्या दिवशी होलिका दहनासाठी महाराष्ट्रात वर्गणी गोळा करुन शेणाच्या गोवऱ्या, लाकडं, एरंडाची फांदी, ऊस आणि पूजा साहित्य आणले जाते. होलिका सजवली जाते त्यानंतर परिसरातील मंडळी एकत्र येत होलिकासमोर नारळ फोडून दहन केलं जातं. यावेळी घरातील स्त्रिया होलिका राक्षसीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवते. 

त्यामागे आहे 'ही' पारंपरिक कथा

एका आख्यायिकानुसार ढुंढा नावाची एक राक्षसीण जी लहान मुलांचा जीव घ्यायची. तिच्या भीतीने नागरिक त्रस्त होते. ते तिला शिव्या घ्यायाचे तरी ती दाद देत नव्हती. शिव्या झाल्या बोंबा मारल्या तरीही राक्षसीण घाबरत नव्हती. अशावेळी गावातील लोकांनी सूर्यास्तानंतर एकत्र आली आणि सर्व घरातून पाच पाच शेणाच्या गोवऱ्या, पाच पाच लाकडे आणली आणि ती गोलाकार स्वरुपात रचली. आता त्यांनी या लाकड्याला आग लावली आणि राक्षसिणीच्या नावाने बोंबा आणि शिव्या देऊन शोधू लागले.

हेसुद्धा वाचा - होळीला शेणाच्या गोवऱ्या का जाळतात? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे?

दुसरीकडे हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने शेतातून नवीन गहू आणि हरभऱ्याची डाळ घरोघरी आली होती. त्यामुळे घरातील बायकांनी पीठ दळून आणि पुरण तयार करुन पुरण पोळी केली.  पुरणपोळीवर तुपाची धार, भात, भाजी असं नैवेद्य केळीच्या पानावर अग्नीसमोर दाखवला. तिथल्या जमलेल्या पुरुषांनी अग्निनारायणाला तीन प्रदक्षिणा मारल्या. हे पाहून राक्षसिणी घाबरली ही लोकं आपल्या अग्नीत भस्म करेल म्हणून ती दूर दूर पळून गेली. 

तेव्हापासून पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. होळीचा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात होलिकेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरु झाली. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी 'होळी रे होळी पुरणाची पोळी...' अशी घोषणाबाजी देण्याची प्रथा सुरु झाली. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)