होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन

Holi Food Recipe: होळी म्हटलं की रंगाची उधळण आणि थंडाई आणि पुरणपोळीचा फक्कड बेत. पण तुम्हाला माहितीये का थंडाई का पितात, याचे कारण जाणून घेऊया 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 19, 2024, 06:11 PM IST
होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन title=
Holi Food Recipe Thandai History significance and importance in marathi

Holi Food Recipe: फाल्गुन महिना येताच लोक आतुरतेने वाट पाहतात ते होळीची. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. कोकणात होळी शिमगोत्सव म्हणून जगप्रसिद्ध आहे. होळीसाठी आपसूकच चाकरमान्यांची पावलं गावी वळतात. तसंच, होळीचा सणाचे महत्त्व पुरणपोळी आणि थंडाई याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवायची परंपरा आहे. तर, उत्तर भारतात वगैरे थंडाई बनवली जाते. पण तुम्हाला माहितीये का या थंडाईचे धार्मिक महत्त्वदेखील तितकेच आहे. 

थंडाई हे एक पारंपारिक पेय आहे. याचा आनंद कित्येक दशकांपासून घेतला जातो. खासकरुन शिवरात्री आणि होळी या दिवसांत थंडाई पिण्यास वेगळेच महत्त्व आहे. यामुळं लोक वेगवेगळ्या प्रकारची थंडाई पियून होळीचा सण साजरा करतात. पण तुम्हाला माहितीये का थंडाई पिण्याची सुरुवात कधीपासून झाली आणि त्याचा इतिहास काय आहे? आज आम्ही तुम्हाला त्याबाबत सांगणार आहोत. 

थंडाईचा इतिहास 

थंडाईचा इतिहास प्राचीन भारतातून येतो. असं म्हणतात की त्यात औषधीय गुण आहेत आणि याता वापर शरीराला थंडावा देण्यासाठी व इंद्रियांना शांत करण्यासाठी केला जातो. थंडाईच्या नावातच याचा अर्थ आहे. या पेयात नट्स, दूध आणि मसाल्यांचा वापर केला जातो. पुराणातही थंडाईचा उल्लेख आढळतो. आता थंडाईचा शोध कधी व कुठे लागला याबाबत जाणून घेऊया. 

पुरणात असं म्हटलं आहे की, थंडाई सर्वात पहिले भगवान शिव यांना अर्पण करण्यात आली होती. महाशिवरात्रीला सगळ्यात पहिले थंडाई बनवण्यात आली होते. याच दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. याबाबतच आणखी एक मान्यता अशी पण आहे की, महाशिवरात्री म्हणजेच लग्नानंतर भगवान शिव हे एक तपस्वी जीवन सोडून वैवाहिक जीवन सुरू करत होते. याचच आनंद म्हणून होळीच्या दिवशी भांगेची थंडाई प्यायली जाते. थंडाईचा पहिल्यांदा उल्लेख 1000 इसवीसन पूर्वमध्ये आढळला होता. याचमुळं हे देशातील सर्वात प्राचीन पेय म्हणून मानले जाते. 

थंडाईचे फायदे

थंडाई प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. होळीनंतर उन्हाळा सुरू होतो त्यामुळं थंडाई प्यायली जाते. यात औषधी गुणधर्मदेखील असतात. थंडाईमध्ये बडिशेप, खरबूजच्या बिया, बादाम इत्यांदीचा वापर केला जातो. 

थंडाई कशी बनवाल?

सगळ्यात पहिले बदाम, काजू, पिस्ता, खरबूजाच्या बिया आणि खसखस थोड्याशा दूधात टाकून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर एका भांड्यात दूध उकळवून घ्या आणि त्यात केसर टाका. 

जेव्हा दूध उकळेल तेव्हा त्यात साखर टाका. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर मंद आचेवर शिजवून घ्या. त्यानंतर हिरवी वेलची, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, दालचीनी आणि काळि मीरी एकत्र घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता ही पेस्ट दूधात टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. तीन ते चार मिनिटांपर्यंत मंद अचेवर शिवजून घ्या. त्यानंतप दूधात पेस्ट करुन घेतलेली पावडर त्यात टाकून एकजीव करुन घ्या. आता दूध थंड करुन ते प्या. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)