राशीभविष्य : 'या' 5 राशींच्या लोकांची रखडलेली काम होणार पूर्ण

असा असेल आजचा दिवस 

Updated: Mar 6, 2020, 07:43 AM IST
राशीभविष्य : 'या' 5 राशींच्या लोकांची रखडलेली काम होणार पूर्ण  title=

मुंबई : दररोज नक्षत्र आपली चाल बदलत असतात. या सगळ्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतात. याच ग्रहांच्या आधारे आपल्या जीवनात काही शुभ-अशुभ घटना घडत असतात. या ग्रहांबरोबरच आपलं कर्म अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे पाहूया आजचं 12 राशींच राशीभविष्य 

मेष - रखडलेली सर्व काम आज पूर्ण होतील. कौटुंबिक नाती खूप चांगली होतील. आपली प्रतिमा सुधारण्याची आज दाट शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी आज चांगला दिवस आहे. जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवाल. 

वृषभ - कामात व्यस्त रहाल. मेहनतीचं फळ आज मिळणार आहे. नवीन व्यवहार करण्याचा योग आहे. आजचा दिवस चांगला आहे. त्यामुळे काही महत्वाचे निर्णय असतील तर ते आज घ्या. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. लग्न जुळतील. 

मिथुन - घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. पैशांची थोडी चिंता जाणवेल पण त्याची काही गरज नाही. दुपारनंतर पैशाचे सगळे प्रश्न सुटतील. कामात थोडं तणावाच वातावरण असेल. शुक्रवार विकेंड सुरू होत असल्यामुळे कुटुंबासोबत काही खास बेत कराल. 

सिंह - कुटुंबात सुख-शांती वाढेल. कामात नवीन व्यवहार कराल. यासंबंधीचे महत्वाचे निर्णय अथवा कागदपत्राची कामे आजच करून घ्या. ऑफिसमध्ये कुणी व्यक्तीगत रूपात तुम्हाला मदत करेल. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्या व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त करा. 

कन्या - कामकाज वाढेल यामुळे कामातील व्यस्तता, ताण-तणाव आणि पैशांची उलाढाल सगळंच वाढेल. पण असं असलं तरीही तुम्हाला आज सहकाऱ्यांकडून, कुटुंबाकडून खूप चांगल सहयोग मिळणार आहे. आणि हेच सहकार्य तुम्हाला आणखी बळ देऊन जाणारं ठरेल. रखडलेली सर्व काम आज होतील. दिवस थकवणारा आहे. काळजी घ्या. 

तूळ - नोकरी किंवा बिझनेसमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज थोडी जास्त मेहनत करावी लागेल. मात्र तुम्हाला यश मिळणार हे निश्चित. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. मुलांकरता जी स्वप्न पाहत आहात ती नक्की पूर्ण होतील. 

वृश्चिक - व्यवसायात थोडा कमी फायदा होईल पण नाराज होऊ नका. काम ही अशीच असली तरीही पैशाची अडचण जाणवणार नाही. विचार केलेल्या कामांचा आज सपाटाच लावाल. सर्व काम पूर्ण करून आरोग्याकडे लक्ष द्याल. अविवाहितांनी थोडी अधिक मेहनत करावी. 

धनू - बऱ्याच दिवसांपासून रखडलेली सर्व काम पूर्ण कराल. विचारपूर्वक निर्णय घ्या त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. पैशांची स्थिती बदलणार आहे. धनलाभ होणार आहे. जोडीदारासोबतच नातं आणखी खास होणार आहे. जेवणात तिखट पदार्थ टाळा त्रास होईल. 

मकर - नवीन व्यवहार आज करू नका. थोडा विचार करा मगच या व्यवहारात हात घाला. दिवसाची सुरूवात चांगली नाही. इच्छा नसताना देखील खर्च होईल. यामुळे थोडी चिडचिड होईल पण ती टाळा. कधी कधी आज खर्च केलेला पैसा उद्या दामदुपटीने परत मिळतो. 

कुंभ - आर्थिक तंगी संपणार. खर्च आणि मिळणारा पैसा यामध्ये चांगला मेळ घाला. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळेल. अचानक धन लाभ झाल्यामुळे फायदा होईल. आज काही ठाम निर्णय घ्याल. ज्यामुळे रखडलेली सर्व काम पूर्ण होतील. 

मीन - व्यवहार वाढवण्याच्या दृष्टीकोनातून विचार करा. जे जसं सुरू आहे तसं चालू राहू द्या. आगामी काळात याचा फायदा होणार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. अविवाहितांसाठी आजचा दिवस खास ठरेल. लग्न जुळतील.