आजचे राशिभविष्य | शनिवार | ५ जानेवारी २०१९

जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Jan 5, 2019, 07:20 AM IST
आजचे राशिभविष्य | शनिवार | ५ जानेवारी २०१९ title=

मेष- आर्थिक चणचण जाणवण्याची शक्यता. नव्या गोष्टी सुरु करण्याचा विचार तुर्तास पुढे ढकला. व्यवहारात सावधान राहावे लागेल, एखाद्या गोष्टीवर अडून राहू नका. पैशाचे आणि गुंतवणुकीचे व्यवहार टाळा. मानसिक त्रास होण्याची शक्यता.

वृषभ- नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता. नव्या व्यावसायिक ओळखी होतील. जुन्या गोष्टींचे दडपण दूर होईल. जोडीदाराकडून आर्थिक सहकार्य मिळेल.

मिथुन- नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला दिवस. एखादी सुवार्ता कानावर पडेल. खास व्यक्तींच्या भेटीगाठीचा योग. संयम बाळगा. पूर्वी केलेल्या कामाचा फायदा मिळेल.

कर्क- खर्च आणि कामाच्या धावपळीमुळे दमछाक होईल. नोकरी किंवी व्यवसायात हितशत्रूंपासून सावध राहा. भागीदारीत वाद होण्याची शक्यता. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. 

सिंह- ऑफिसमध्ये तणावाच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक आणि मानसिक आघाडीवर दमछाक होईल. व्यवसायानिमित्त प्रवास होण्याची शक्यता. कामाचा व्याप वाढेल. 

कन्या- कार्यक्षेत्रात यश मिळेल. बऱ्याच काळापासून थकलेली येणी वसूल होतील. गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी अनुकूल दिवस. 

तूळ- आजचा दिवस फलदायी असेल. थकबाकीदारांकडून येणी वसूल करण्यासाठी चांगला दिवस. नोकरी किंवा व्यवसायात एखादा निर्णय चांगलाच यशस्वी ठरेल. 

वृश्चिक- कामात मन एकाग्र होईल. धनलाभ होण्याची शक्यता. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. जोडीदारासोबत फिरायला जाल. 

धनु- नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कुठेही गुंतवणूक करु नका. जोडीदाराचे मन दुखावले जाण्याची शक्यता. पोटाच्या तक्रारी उद्भवतील. 

मकर- दैनंदिन कामकाज आणि आर्थिक आवक होण्याच्यादृष्टीने चांगला दिवस. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. प्रेमप्रकरण असणाऱ्यांसाठी चांगला दिवस. प्रकृतीची काळजी घ्या. 

कुंभ- आर्थिक चणचण संपेल. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळाल्याने एखादे काम मार्गी लावाल. अचानक धनप्राप्ती होऊ शकते. मुलांबाबत चांगल्या गोष्टी घडतील. 

मीन- व्यवसाय किंवा नोकरीत तणाव वाढेल. दैनंदिन कामांसाठी धावपळ करावी लागेल. सर्व कामं एकाचवेळी करायला जाल. त्यामुळे तणाव वाढेल. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. थकवा आणि आळस जाणवेल.