Horoscope 10 october : आजचा दिवस 'या' राशींसाठी द्विगुणित आनंदाचा, लग्न- नोकरीच्या नव्या संधीचा

जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय... 

Updated: Oct 10, 2022, 06:41 AM IST
Horoscope 10 october : आजचा दिवस 'या' राशींसाठी द्विगुणित आनंदाचा, लग्न- नोकरीच्या नव्या संधीचा  title=
rashi bhavishya daily horoscope today 10 october 2022

Horoscope 10 october : दिवसाची सुरुवात करा राशीभविष्यापासून. पाहा तुमच्या राशीत आज नेमकं काय लिहिलंय आणि तुम्हाला कुठे सावध व्हायचंय... 

मेष- किमान स्वत:ला फसवू नका. तांदूळ किंवा कापड दान करा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. 

वृषभ- धार्मिक कारणांनी एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. त्वचेसंबंधीच्या तक्रारी सतावतील. आपल्या लोकांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. 

मिथुन- कुटुंबात तणावाचं वातावरण असेल. पण, कोणा एका व्यक्तीच्या साथीनं तुम्ही यातूनही तरुन जाल. कपाळावर देवाच्या नावाचं कुंकू लावा. 

कर्क- अडकलेले आणि बुडालेले पैसे परत मिळणार आहेत. अनेक अडचणींवर तोडगा निघणार आहे. आज लग्नासाठीचे काही नवे आणि तुमच्या पसंतीस पडणारे प्रस्ताव येणार आहेत. 

सिंह- आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात प्रगतीचा योग आहे. तुमच्या वाटेत असणारे अडथळे दूर होणार आहेत. 

कन्या- अपयश तुमच्यापासून मैलो दूर जाणार आहे. तुमचे निर्णय सार्थ ठरतील. इतरांचा विश्वास जिंकाल. 

तुळ- आरोग्याची काळजी घ्या. लग्नामधील अडचणी दूर होणार आहेत. मनाजोगा जोडीदार तुमचं आयुष्य बदलणार आहे. 

वृश्चिक- नोकरी बदलण्यासाठी एखाचा नवा आणि उत्तम पर्याय तुम्हाला मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळणार आहे. 

धनु- बोलण्यावर ताबा ठेवा. अधिक घाई करु नका. सध्याचा काळ आणि वेळ तुमच्या कलानं आहे. संधीचं सोनं करा. 

मकर- दिवस आनंदात व्यतीत होणार आहे. रात्रीच्या वेळी जास्त वेळ बाहेर राहू नका. आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ- आवडत्या ठिकाणी भेट देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीमध्ये बढती मिळेल. पक्ष्यांना दाणे द्या. 

मीन- दिवस काहीसा आळसावलेला असेल. पण, उत्तरार्धात एखादी आनंदवार्ता मिळाल्यामुळं संपूर्ण दिवस सार्थकी लागल्याची भावना मनात घर करेल.