हे 6 उपाय केल्यास शनिदेव होतील प्रसन्न, शनीची महादशा आणि साडेसाती कुंडलीतून होईल दूर

जाणून घ्या टिप्स...

Updated: Oct 14, 2022, 06:33 PM IST
हे 6 उपाय केल्यास शनिदेव होतील प्रसन्न, शनीची महादशा आणि साडेसाती कुंडलीतून होईल दूर title=

मुंबई : शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. प्रत्येक व्यक्तीची कृती पाहून त्यानुसार ते फळ देतात. शनीची दशा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. अशा स्थितीत जर एखाद्याच्या राशीत शनि कमजोर झाला तर त्याच्या आयुष्यात अनेक समस्या सुरू होतात. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की हे उपाय केल्याने शनिदेव व्यक्तीवर आपला कृपावर्षाव करतात आणि शुभ फळ देतात. चला जाणून घेऊया शनिदेवाशी संबंधित ते खास उपाय कोणते आहेत.

शनिदेवाचे अपायकारक प्रभाव टाळण्यासाठी उपाय 

शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करावे. यासोबतच शनीची शक्ती मजबूत करण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी. ही अंगठी घोड्याच्या नाळेची असावी.

शुक्रवारी रात्री स्वयंपाकघरात काळे हरभरे पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर शनिवारी कच्चा कोळसा आणि हरभरा काळ्या कपड्यात बांधून माशासमोर ठेवा. वर्षभर प्रत्येक शनिवारी असे केल्याने शनिदेवाचा कोप शांत होतो.

काळ्या कुत्र्याला चपाती खायला द्या

शनिदशा पासून सुटका मिळवण्यासाठी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलात बनवलेली चपाती खाऊ घालावी. गरजूंना शक्य तेवढी मदत करा.

शनिवारी शनिदेवाला 19 हात लांब काळा धागा बांधून माळ घालावी. यानंतर ती माळ गळ्यात घाला. असे केल्याने शनिदेव शांत होतात असे मानले जाते.

शनीच्या महादशासाठी हे उपाय करा

शनीची महादशा, धैय्या किंवा साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावावा. यानंतर पिंपळाच्या झाडाची किमान तीन वेळा प्रदक्षिणा घालावी. या उपायाने शनिदेव प्रसन्न होतात असे मानले जाते.

शनिदेवाची अशुभता दूर करण्यासाठी दर शनिवारी किंवा शक्य असल्यास रोज कावळ्यांना धान्य खाऊ घाला. तसेच प्रत्येक शनिवारी विधीपूर्वक शनिदेवाची पूजा करावी. या पद्धतीचा अवलंब केल्यानं कुटुंबावर शनिदेवाची कृपा कायम राहते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)