Shani Vakri : कुंभ राशीत शनी देवांची वक्री चाल; 4 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर

Shani Vakri : 17 जून रोजी शनी देव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री स्थितीत आहेत. 4 नोव्हेंबरला शनी मार्गस्थ होणार आहेत. शनीच्या वक्रीमुळे 3 राशींना या काळात थोडी काळजी घ्यावी लागणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 19, 2023, 08:45 AM IST
Shani Vakri : कुंभ राशीत शनी देवांची वक्री चाल; 4 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर title=

Shani Vakri : वैदिक ज्योतिषात शनिदेवाला न्याय आणि कर्मासाठी जबाबदार ग्रह मानण्यात आलं आहे. सर्व ग्रहांमध्ये शनी देवाची गती सर्वात संथ गती आहे. शनीच्या बदलामुळे लोकांवर त्याचे शुभ-अशुभ प्रभाव दीर्घकाळ राहतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या राशीतील बदलाला खूप महत्त्व दिलं जातं. 

17 जून रोजी शनी देव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री स्थितीत आहेत. 4 नोव्हेंबरला शनी मार्गस्थ होणार आहेत. शनीच्या वक्रीमुळे 3 राशींना या काळात थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. जाणून घेऊया शनी वक्रीमुळे कोणत्या राशींच्या आयुष्यात गोंधळ होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी शनिदेव आठव्या घरात वक्री आहेत. यावेळी तुम्हाला विचार करूनच कोणतीही गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुम्हाला पराभूत करण्यासाठी नवीन मार्ग शोधतील. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहा. वैयक्तिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी शनिदेव आता चौथ्या भावात वक्री आहेत. शनि वक्री झाल्यामुळे या राशींच्या व्यक्तींना काही मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी कोणतरी तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी पूर्ण मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. यावेळी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. 

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी शनि दुसऱ्या घरात वक्री असणार आहे. शनी वक्रीमुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. तुम्ही खोटे बोलल्यास मोठ्या संकटात सापडू शकता. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक द्या. कोणत्याही कारणावरून वाद होऊ शकतात. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )