Shukra Uday 2022: या राशींचे अच्छे दिन सुरु! शुक्राचा उदय करिअरबरोबर देईल धन संपत्ती

Venus Rise 2022: शुक्र गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन आले आहेत. शुक्र ग्रहाचा उदय तीन राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची आणि उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. काही बेरोजगारांना रोजगार मिळेल. 

Updated: Nov 26, 2022, 08:05 AM IST
Shukra Uday 2022: या राशींचे अच्छे दिन सुरु! शुक्राचा उदय करिअरबरोबर देईल धन संपत्ती title=

Shukra Uday: शुक्र गोचरचा प्रभाव काही राशींसाठी चांगला दिसून येणार आहे.  शुक्र गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन आले आहेत. ज्योतिषशास्त्रात शुक्राला संपत्ती, विलास, प्रेम, सौंदर्य आणि ऐश्वर्य यांचा दाता म्हणून वर्णन केले आहे. जर शुक्र ग्रह शुभ असेल तर व्यक्ती सुखी, विलासी जीवन जगते. गेल्या दोन ऑक्टोबरपासून शुक्र ग्रह अस्त झाला होता, त्यामुळे लग्नासारखी शुभ कार्ये रखडलेली होती. यासोबतच काही राशीच्या लोकांवरही त्याचा वाईट प्रभाव पडत होता. आता 20 नोव्हेंबर 2022 रोजी शुक्राचा उदय झाला आहे. त्यामुळे काहींचे सोनेरी दिवसही सुरु झाले आहेत.  शुक्र ग्रहाचा उदय तीन राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असणार आहे

शुक्राचा उदय या राशींचे उजळणार भाग्य

वृषभ : शुक्राचा उदय महत्वाचा मानला जात आहे. कारण काही राशींचा याचा खूपच लाभ मिळत आहे.  शुक्राचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. लग्न होण्याची दाट शक्यता आहे. करिअर चांगले होईल. धनलाभ होईल. भागीदारीतील कामे फायदेशीर ठरू शकतात.

तूळ : तूळ राशींसाठी शुक्राचा उदय भाग्यशाली असणार आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय खूप फायदेशीर ठरेल. त्याचे उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. विवाह होऊ शकतो. जोडीदाराची साथ चांगली राहील. नवीन घर-कार खरेदी करु शकता. 

कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी नोकरी-व्यवसायात लाभ होईल. काही लोकांना प्रमोशन मिळू शकते. पगारात वाढ होऊ शकते. शुक्राचा उदय कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देईल.  व्यवसायात लाभ होईल. विशेषत: जे भागीदारीत काम करतात, त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. अविवाहित लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)