Sita Navami 2023 : आज सीता जयंती! शुभ मुहूर्त पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

Sita Navami 2023 : ज्या दिवशी सीता माता यांचा जन्म झाला त्या दिवसाला सीता जयंती, सीता नवमी किंवा जानकी नवमी म्हणून ओळखलं जातं. अशा या शुभ दिनी पूजा विधी आणि महत्त्वबद्दल जाणून घ्या.  

नेहा चौधरी | Updated: Apr 29, 2023, 08:27 AM IST
Sita Navami 2023 : आज सीता जयंती! शुभ मुहूर्त पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या  title=
sita navami 2023 time puja vidhi shubh muhrat importance significance in marathi

Sita Navami 2023 : हिंदू पंचांगानुसार आज वैशाख महिन्याची शुक्ल पक्षातील नवमी म्हणजे आज सीता नवमी, सीता जंयती. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सीतेची पूजा केल्यास आपल्या आयुष्यातील सर्व सकंट दूर होतात. शुक्रवार, 28 एप्रिल 2023 ला दुपारी 04:01 वाजता नवमी सुरु झाली आहे आणि 29 एप्रिलला म्हणजे आज संध्याकाळी 06:22 वाजेपर्यंत असणार आहे. आज रवि योगही जुळून आला आहे. सीता नवमीचा उत्सव हा अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. (sita navami 2023 time puja vidhi shubh muhrat importance significance in marathi )

सीता नवमी शुभ मुहूर्त 

पंचांगानुसार सीता नवमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 10:59 ते दुपारी 01:38 पर्यंत आहे. 

सीता नवमीची पूजा पद्धत

सकाळी उठून स्नान झाल्यानंतर घरातील मंदिराची स्वच्छता करावी. 
पूजा केल्यानंतर देवतांना गंगाजलाने अभिषेक करा. 
महिला आजच्या दिवशी उपवास केल्यास त्यांनी फक्त फळं ग्रहण करावे. 
राम-सीता मंदिरात जाऊन पूजा अर्चा करा. 
सर्व देवतांना फळं, तीळ, जव आणि तांदूळ अर्पण करा. 
पूजेनंतर आरती करा आणि नैवेद्य लावून प्रसाद वाटप करा. 
या दिवशी हनुमानजींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. 

सीता नवमीला या गोष्टी करा!

या दिवशी सीता मातेच्या फोटोसमोर पूजा करुन हळदीच्या पाच गुंठ्या लाल कपड्यात बांधून मातेला अर्पण करा. असं केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

मनासारखा नवरा किंवा मनासारखी बायको हवी असेल तर रामचरित्र मानस 'जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चकोरी' या मंत्राचा जप करा.

या दिवशी सीता मातेला सोळा अलंकाराचे साहित्य अर्पण करा. 

सीता मातेला भूमिजा असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी व्रत केल्यास भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळते. 

 या शुभ दिवशी सीतारामाची पूजा केल्याने 16 महादानाचे फळ, भुदानाचे फळ, तसेच सर्व तीर्थक्षेत्रांचे फळ मिळते.

सीता माता आरती

आरति श्रीजनक-दुलारी की। सीताजी रघुबर-प्यारी की।।
जगत-जननि जगकी विस्तारिणि, नित्य सत्य साकेत विहारिणि।
परम दयामयि दीनोद्धारिणि, मैया भक्तन-हितकारी की।।
आरति श्रीजनक-दुलारी की।

सतीशिरोमणि पति-हित-कारिणि, पति-सेवा-हित-वन-वन-चारिणि।
पति-हित पति-वियोग-स्वीकारिणि, त्याग-धर्म-मूरति-धारी की।।
आरति श्रीजनक-दुलारी की।।

विमल-कीर्ति सब लोकन छाई, नाम लेत पावन मति आई।
सुमिरत कटत कष्ट दुखदायी, शरणागत-जन-भय-हारी की।।
आरती श्री जनक-दुलारी की। सीता जी रघुबर-प्यारी की।।

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)