Solar Eclipse 2022: दिवाळीच्या रात्रीपासून लागणार सूर्यग्रहण सूतक, जाणून घ्या कालावधी

Surya Grahan 2022 Date and Time: सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि दिवाळीला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला असणार आहे. 

Updated: Oct 23, 2022, 06:57 PM IST
Solar Eclipse 2022: दिवाळीच्या रात्रीपासून लागणार सूर्यग्रहण सूतक, जाणून घ्या कालावधी title=

Surya Grahan 2022 Date and Time: सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि दिवाळीला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला असणार आहे. सूर्यदेवांनी गेल्याच आठवड्यात तूळ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत सूर्यग्रहण (Solar Eclipse) असणार आहे. विशेष म्हणजे या राशीतच केतू ग्रह ठाण मांडून असल्याने काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येईल. 

सूर्यग्रहण आयलँडमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी सुरू होईल आणि अरबी समुद्रात संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी समाप्त होईल. भारतात हे सूर्यग्रहण दुपारी 4 वाजून 29 मिनिटांनी सुरु होईल आणि संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुरू होतो. भारतात सूर्यग्रहण दुपारी 4 नंतर दिसणार आहे. त्यामुळे भारतात त्याचा सुतक कालावधी २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होईल.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार?

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा या खगोलीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. अमावास्याला सूर्यग्रहण होते. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध असेल. याआधी 30 एप्रिलला सूर्यग्रहण झालं होतं. मात्र हे ग्रहण भारतातून दिसलं नव्हतं.

Shani Margi 2022: शनिदेव झाले मार्गस्थ, या पाच राशींवर असेल वक्रदृष्टी! जाणून घ्या उपाय

राशींवर ग्रहणाचा प्रभाव

मेष: या कालावधीत स्त्री चिंता वाटेल, वृषभ: या कालावधीत सौख्यात बाधा येईल, मिथुन: या काळात सतत कसली तरी चिंता वाटत राहील, कर्क: या राशीलाही चिंता सतावेल, सिंह: या राशीवर शुभ परिणा दिसून येतील, कन्या: या राशीला या काळात नुकसान सहन करावं लागू शकतं, तूळ: ग्रहण कालावधीत जपून वागावं, वृश्चिक: या काळात नुकसान होऊ शकतं, धनु: या कालावधी अनपेक्षित लाभ मिळू शकतो , मकर: या राशीसाठी हा काळ आनंदायी असेल, कुंभ: या कालावधीत अपमान होण्याची शक्यता आहे, मीन: या कालावधीत दु:ख सहन करावं लागेल.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)