आजचे राशीभविष्य | रविवार | 27 जानेवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Jan 27, 2019, 08:17 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | 27 जानेवारी 2019 title=

मेष : आपल्या कामाबाबत गंभीरतेने विचार करा. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यावर लक्ष द्यायला हवा. नव्या लोकांशी ओळखी होण्याचे काही फायदे होतील. शिक्षण, व्यवसाय, नोकरी किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी प्रवास करावा लागेल. यात्रे दरम्यान काही नव्या गोष्टी तुम्हाला समजतील. विवाह संदर्भात चर्चा होऊ शकते. सकारात्मक व्यक्तीशी तुमचे बराच वेळ बोलण होईल. 

वृषभ : अचानक फायदा होऊ शकतो. धन लाभाचे योग आहेत. तुमचे विचार प्रेरित करणाऱ्यांशी तुमची भेट होईल. तुमच्या भावना आणि काळजी तुम्ही चांगल्या प्रकारे व्यक्त कराल. रोजच्या कामातील काही कामे पूर्ण होतील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. 

मिथून : आज तुमच्या कामामध्ये जोश दिसेल. नवी माणसे तुमच्याशी जोडली जातील. नाती मजबूत होतील. कोणते नाते मजबूत करण्यासाठी किंवा तुटलेले नाते जोडण्यासाठी कोणाचा तरी सल्ला घेतला तर फायदा होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. अचानक समोर आलेल्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा. 

कर्क : मुलांकडून मदत होऊ शकते. व्यवयासात नशिबाची साथ मिळाल्याने जास्तीत कामे पूर्ण होतील.  पैसे किंवा रोजगारी संदर्भात कोणती तरी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या काही व्यक्तींसोबतचा व्यवहार आणि बोलणी यशस्वी होतील. तुम्ही सकारात्मक राहाल. आज तुम्ही जे काम कराल त्यामध्ये तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण होतील.

सिंह : तुमच्या जीवनात मोठे बदल होतील. आज नव्या लोकांशी मैत्री होऊन संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि क्षमता आज विकसित होतील. तुम्ही तुमची वेगळी ओळख बनवण्यास सक्षम असाल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. भागीदारीमध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये तुम्हाला फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाईल. 

कन्या : तुमचे वागणे सहानभूतीचे असेल. अनेक प्रकरणांचे गांभीर्य तुम्हाला समजेल. आई वडीलांसोबतचे संबध सुधारण्याचे योग आहेत. कोणत्या तरी मित्राला तुमचा सल्ला घेतल्याने मोठा फायदा होईल. तुमच्या सल्ल्याने सहकार्यांची कोणती तरी समस्या संपून जाईल. तुम्ही कोणता तरी निर्णय घ्याल ज्याचा परिणाम दुसऱ्यांवर होईल. मित्रांशी संपर्क करत राहाल. वैवाहीक आयुष्य चांगले राहील.

तुळ : कोणत्या तरी गोष्टीमुळे मनात उत्साह असेल. चांगले बोलण्याने तुमचे प्रयत्न पूर्ण होतील. कोणती महत्त्वपूर्ण बोलणी किंवा मुलाखतीत तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही निस्वार्थपणे कोणतेतरी काम कराल. तुम्ही सकारात्मक राहाल. तुमच्यासाठी दिवस सामान्य असेल. परिवारात कोणता तरी नवा सदस्य येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवाल तर तुमचे आरोग्य छान राहील. 

वृश्चिक : सुखद आणि आनंददायक दिवस राहील.तुम्ही स्वत:मध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न कराल. काही योजना तुमच्या मनात येतील ज्यामुळे तुमचा दिवस खास होईल. करिअरच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला असेल. जो काही प्रस्ताव असेल त्यावर चर्चा करण्यात यशस्वी व्हाल. ऑफिसमध्ये तुमच्या वागण्यात विनम्रता ठेवा. कोणता तरी नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतो. परिवारासोबत दिवस चांगला जाईल. 

धनु : आज तुम्ही थोडे व्यवहारिक राहाल. यामुळे तुम्हाला फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात तुम्ही जास्त सक्रिय राहाल. भावनात्मक दृष्टीने देखील तुम्ही उत्साही राहाल. तुम्हाला स्वत: वर पूर्ण विश्वास आहे आणि इतरांवरही ठेवाल. नवे विचार डोक्यात येतील. नव्या प्रेम संबंधाना सुरूवात होण्याची शक्यता आहे. खूप जणांचे फॅन्स बनू शकतात. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाईल. 

मकर : आज तुम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या व्यस्त असाल. तुमच्या कामातून मागे हटू नका. पैसे कमावण्याच्या काही चांगल्या संधी मिळू शकतील. तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही स्वत: ची वेगळी ओळख बनवू शकाल. तुमची कमाई वाढेल. मुलांच्या प्रगतीने आनंद होईल. आज तुम्ही व्यवसायात काही नव्या योजना आणू शकाल. ज्या पुढे जाऊन तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. 

कुंभ : घेण्यादेण्याच्या बाबतीत तुम्हाला गंभीर राहायला हवे. तुमच्यासाठी दिवस चांगला राहील. भविष्यातील योजनांकडे लक्ष द्या. जोडीदारासोबतचे मतभेद संपवण्याचे प्रयत्न होतील. यामध्ये तुम्हाला यश मिळेल. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. मुलांसदर्भातील काही चांगल्या गोष्टी कळतील.  आई वडीलांची मदत मिळेल. 

मीन : नशिबाची साथ मिळेल. आजची स्थिती आणि तुम्हाला भेटालया येणारे लोक काही नवे करण्याची प्रेरणा देतील. यावेळी केल्या गेलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकते. सध्याच्या नोकरीमध्येच तुम्हाला जास्त जबाबदारी मिळू शकेल. तुमची कमाई वाढण्याचे योग आहेत. तुमचे मन कामात लागेल. सासुरवाडीकडून काहीतरी गिफ्टही मिळू शकते. 

- दीपक शुक्ला