आजचे राशीभविष्य : 'या' राशीसाठी आज शुभदिवसासह धनलाभाची शक्यता

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस   

Updated: Jun 25, 2020, 07:16 AM IST
आजचे राशीभविष्य : 'या' राशीसाठी आज शुभदिवसासह धनलाभाची शक्यता  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- काही कामांमध्ये अडचणी येतील. जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरी बदलण्याची इच्छा होईल. विचारपूर्वकपणे निर्णय घ्या. कोणत्याही कामात घाई करु नका. 

वृषभ- व्यापारामध्ये फायदा होणार आहे. नोकरीसापेक्ष व्यक्तींना कामाच्या ठिकाणई बढती मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये प्रगती होणार आहे. कामाच्या पद्धतीमध्ये बदल करा. 

मिथुन- नक्षत्रांची स्थिती चांगली आहे. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही सक्रिय असाल. एखादी नवी जबाबदारी तुम्हाला मिळू शकेल. सामाजिक कामांच्या निमित्तानं काही व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. आरोग्य सुधारेल. 

कर्क- आज तुम्ही इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील असाल. जास्तीचं काम मिळाल्यामुळं गोंधळ उडेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. धनलाभाची शक्यता आहे. 

 सिंह- वरिष्ठांकडून सहकार्याचा अभाव असेल. त्यामुळं सावधगिरीनंच निर्णय घ्या. व्यवसायामध्ये यश मिळेल. पण, त्यासाठी कमालीची मेहनत करावी लागणार आहे. अपूर्ण कामं मार्गी लावा. यातूनच पुढचा मार्ग गवसणार आहे. 

कन्या- नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. साथीदाराकडून एखादी भेट मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. 

तुळ- अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये सहकाऱ्यांचा हातभार लागणार नाही. काही व्यक्ती तुमचा विरोधही करतील. पण, तुम्ही निर्धारित मार्गानं पुढं जा. साथीदारामुळं आजचा दिवस चांगला जाईल. 

वृश्चिक- व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. नोकरीसापेक्ष लोकांसाठी सध्याची वेळ चांगीली आहे. जुने वाद कमी होतील. नव्या कामांसाठी पुढाकार घ्याल. काही चांगल्या संधी तुम्हाला यशाच्या मार्गावर नेतील. दिवस शुभ आहे. 

धनु- दिवस शुभ आहे. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. कामात येणाऱ्या अडचणी ओळखून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. 

मकर- जुन्या अडचणी दूर होतील. अडकलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस उत्साही आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. 

 

कुंभ- करिअरच्या दृष्टीनं आजचा दिवस चांगला आहे. चांगले बदल होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. धनलाभाची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन- अचानक फायदा झाल्यामुळं दिवस शुभ जाणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनं कर्ज फेडाल. अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.