आजचे राशीभविष्य | रविवार | ७ जुलै २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Jul 7, 2019, 11:01 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | ७ जुलै २०१९  title=

मेष- वायफळ खर्च होण्याची शक्यता. थोडे सावधच राहा. इतरांच्या सांगण्याने स्वत:चं नुकसान करुन घ्याल. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. काही व्यक्ती तुमच्या विचारांविषयी गैरसमज करुन घेतील. आज एखाद्या मोठ्या वस्तूच्या खरेदीचा विचार कराल. पोटाचे विकार उदभवतील. 

वृषभ- कामाच्या ठिकाणी दिवस चांगला असेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये आर्थिक लाभ मिळेल. अनेक विचाराधीन कामं पूर्ण होतील. मोठ्या व्यक्ती आणि वरिष्ठांकडून सन्मान मिळेल. जबाबदारी पार पाडाल. आरोग्य सर्वसामान्य असेल. 

मिथुन- व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. कोणत्या एका नव्या प्रस्तावासाठी तयार असाल. अडचणीत अडकलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत कराल. साथीदाराचं सहकार्य मिळेल. 

कर्क- अचानक झालेल्या धनलाभामुळे व्यापारत काही नव्या योजनांची आखणी कराल. नोकरीच्या ठिकाणी इतरांशी असणारे संबंध आणखी दृढ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. दिवस बेताचाच असेल. 

सिंह- वरिष्ठांकडून सहकार्य न मिळाल्यामुळे चिडचीड होईल. तणाव वाढेल. आज काही गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. दैनंदिन कामांमध्ये तातचीने कोणताही निर्णय घेऊ नका. सावध रहा. आर्थिक व्यवहारात कोणा एका व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. कोणत्याही नव्या कामाच्या सुरुवातीसाठी आजचा दिवस चांगला नाही. 

कन्या- नोकरदार वर्गाला बढतीची संधी मिळेल. स्वत:साठी वेळ काढा. काही प्रकरणांमध्ये तुम्ही योग्य दिशेने वाटचाल कराल. कामांची प्रशंसा कराल. साथीदाराकडून सहकार्य मिळेल. आज एखादी शुभवार्ता मिळेल. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायामध्ये अडकलेले पैसे परत मिळतील. वरिष्ठांशी असणारे संबंध दृढ होतील. आज एखादं नवं काम हाती घ्याल. शुभवार्ता कळेल. अडचणीत अडकलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत कराल. गुंतवणुकीची एखादी चांगली संधी तुम्हाला मिळेल. बदलासाठी तयार राहा, साथीदाराचं सहकार्य मिळेल. 

वृश्चिक- व्यापाराशी निगडीत नव्या योजनांची आखणी कराल. नव्या योजना कराल. व्यापारी वर्गाला आजचा दिवस फायद्याचा आहे. व्यापाराविषयी काही कल्पना आखाल. पण, त्यामध्ये काही मोठे बदल घडण्याचीही शक्यता आहे. 

धनु- दैनंदिन कामांमध्ये रुळाल. लहान-लहान गोष्टींवर राग केल्याने कामं बिघडू शकतात. कोणत्याही कामात घाई करु नका. आज आयुष्याला एक वेगळंच वळण मिळेल. सावधगिरीने काम करा. ऋतुमानानुसार होणाऱ्या आजारांचा त्रास होईल. 

मकर- व्यापारात अडकलेले पैसे परत मिळतील. सावधगिरीने गुंतवणूक करा. आर्थिक व्यवहारांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त कामकाज असल्यामुळे अडचणीत येऊ शकता. कौटुंबीक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करु नका. 

कुंभ- प्रत्येक प्रकारच्या संवादात विनम्र राहा. मनातील भावना व्यक्त करण्यास संकोचलेपणा ठेवू नका. आरोग्याशी हेळसांड नको. 

मीन- नव्या व्यवसायाच सुरुवात करण्याची इच्छा होईल. अचानक एखाद्या व्यक्तीची मदत होईल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. कागदोपत्री व्यवहार पूर्ण कराल. आज जास्तच व्यग्र असाल.