आजचे राशीभविष्य | रविवार | ३ मार्च २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस   

Updated: Mar 3, 2019, 09:22 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | ३ मार्च २०१९  title=

मेष - भावंड आणि मित्रमंडळींचं सहकार्य मिळेल. काही नव्या कामांचा शुभारंभ कराल. विचारात असणारी कामंही पूर्णत्वास जातील. जमिनीच्या कामांवर लक्ष द्या. व्यवहाराच्या बाबतीत दिवस चांगला आहे. दिवस, कुटुंब आणि पैशांच्या बाबातील परिस्थिती चांगली आहे. महत्त्वाच्या कामांचे बेत आखाल. जबाबदारीवर लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ- नकारात्मक गोष्टीत गुंतलात तर, महत्त्वाची संधी गमावून बसाल. आज कोणत्याच  निष्कर्षावर पोहोचू नका. स्वभावाच्या बाबतील थोडी तेढ निर्माण होईल. दिवसभरात सावधगिरी बाळगा. विचारपूर्वक बोला. इतरांचं म्हणणं ऐकून घ्या. साथीदारासोबत वाहन चालवतेवेळी सावधगिरी बाळगा. आरोग्य सुधारेल. 

मिथुन- नवी कामं आणि व्यवसायाचे करार होण्याची शक्यता. अडचणींशी दोन हात करण्यासाठी चांगला वेळ. नवे प्रस्ताव पुढे येतील. कामं लवकरात लवकर पूर्णत्वास जातील. अडचणी दूर होतील. 

कर्क- प्रेमाच्या नात्यांमध्ये थोडे गैरसमज निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी हलगर्जीपण नको. विचारात असणारी कामं पूर्णत्वास नेण्यास  वेळ दवडू शकतो. काही कामांमध्ये फार मेहनत करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह- विचारात असणारी काही कामं पूर्ण होणार नाहीत. विविध विचारधारा असणाऱ्या व्यक्तींशी जोडले जाल. पैसे सांभाळा. देवाणघेवाण आणि गुंतवणूकीच्या मुद्द्यांच्या बाबतीत जरा काळजी घ्या. मनात कोणतीही शंका ठेवू नका. कटू वाणी ठेवू नका. कोणताही ना बेत न आखता जुनी कामं पूर्ण करा. आज स्वत:च्या कामांवरच लक्ष द्या.

कन्या- व्यापाराच्या बाबतीत काही नव्या योजनांवर काम सुरू कराल. साथीदाराचं सहर्य मिळेल. प्रेम, नातेसंबंधांसाठ दिवस चांगला. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील. 

तुळ- दिवस चांगला आहे. परिस्थितीचा फायदा घेत काम पूर्ण करण्याला तुमचं प्राधान्य असेल. कामात मन लागेल. अचानक मोठ्या संधी मिळतील. त्या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार राहा. आरोग्य चांगलं असेल. 

वृश्चिक- नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. त्यामुळे तोटाही होऊ शकतो. साशंकता वाढेल. होणाऱ्या नुकसानासाठी तयार राहा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी उदभवतील. आरोग्यात चढ- उतार होतील. 

धनु- आर्थिक अडचणींवर तोडगा निघेल. दाम्पत्य जीवनात सुख मिळेल. समजुतदारपणा आणि काही तडजोडीच्या बळावर अडकलेली कामं पूर्णत्वास न्याल. कर्ज घेउ शकता. मोठ्या अडचणी दूर होतील. नव्या व्यक्तींना भेटण्याचा योग. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. 

मकर- सावधगिरी बाळगा. काही व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी तुमच्यापुढे अडचणी निर्माण करु शकतात. मनात द्विधा मनस्थिती उदभवेल. काही महत्त्वाची कामं अपूर्णच राहतील. कामात मन लागणार नाही. आरोग्याच्या बाबतीत दिवस बेताचाच असेल. 

कुंभ- नोकरीच्या ठिकाणी स्वत:वर ताबा ठेवा. पदाचा फायदाच होईल. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी दूर होतील. आखलेले बेत यशस्वी होतील. अडकलेली कामं पूर्णत्वास नेण्यासाठी दिवस चांगला आहे. अनेक समस्यांवर तोडगा काढाल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन- व्यापाराच्या बाबतील काही अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. मनात असणाऱ्या गोंधळामुळे आज काही कामांमध्ये मन रमणार नाही. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत घाई करु नका. काही बाबतीत तणाव वाढेल. केलेल्या कामांचं फळ मिळालं नाही तर निराश होऊ नका.