Valentine's Day : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रेम

आजचा प्रेमाचा दिवस असा असेल 

Updated: Feb 14, 2021, 08:15 AM IST
Valentine's Day : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रेम  title=

मुंबई : १४ फेब्रुवारी २०२१ व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2021). आज जगभरात हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आज तुमच्या जीवनात प्रेमाचा वर्षाव होणार की नाही हे आज समजेल. असं असेल आजचा दिवस. आज रविवार, सूर्य देवाची आज उपासना करा. यामुळे तुमच्या शरीरावर आणि मनावर खूप चांगला परिणाम होईल. यामुळे तुमच्या शरीरातील दोष दूर होतील. आज पाण्यात लाल चंदन टाकून सूर्यदेवाला अर्पण करा. 

मेष - आज आर्थिक प्रश्न सुटतील. जीवनात आजपासून प्रेमाची स्थिती चांगली राहिली. शुभ बातमी मिळेल. 

वृषभ - प्रेमाचा दिवस आज तुमच्यासाठी छान असेल. प्रेमासोबतच आर्थिक परिस्थिती बदलण्यास मदत होईल. 

मिथुन - आज बिघडलेलं काम पूर्ण होईल. प्रेमाची स्थिती चांगली राहिल. प्रेमात स्पष्टपणा जरूर ठेवा. त्याचा नक्की फायदा होईल. 

कर्क - आजचा दिवस जोखीम भरणारा असेल. कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रेम आणि व्यापार याच्यात गल्लत करू नका. 

सिंह - मन प्रसन्न ठेवा. जो़डीदाराची साथ मिळेल. प्रेम-प्रेमिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. पण अति घाई करू नका. 

कन्या - रखडलेली काम आज होतील. प्रेमात सकारात्मकता असेल. पण कोणतीही घाई करू नका. 

तूळ - भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. प्रेमसंबंध चांगले राहतील. 

वृश्चिक - प्रेमात स्थिती मध्यम असेल. व्यापारी दृष्टीकोन चांगला असेल. पिवळा रंग तुमच्यासाठी खूप चांगला असेल. 

धनू - घराची स्थिती चांगली राहिल. आखलेल्या योजना फळतील. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला असेल. 

मकर - स्वास्थ आज महत्वाचं असेल. प्रेमाचा दिवस चांगला असेल. 

कुंभ - सकारात्मक ऊर्जा आज पाहायला मिळेल. स्वास्थ चांगल राहिल. प्रेमाचा दिवस आहे. 

मीन - प्रेमात आज यशस्वी राहाल. मनात कोणताही ताण ठेऊ नका.