Vastu Shastra : घरात तुळशीचं रोपं या दिशेला चुकूनंही लावू नका, नकारात्मक परिणाम होतील!

तुळशीचं रोप योग्य दिशेने लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, जर तुम्ही ती चुकीच्या दिशेने लावली तर ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणू शकते.

Updated: Jul 22, 2022, 08:30 AM IST
Vastu Shastra : घरात तुळशीचं रोपं या दिशेला चुकूनंही लावू नका, नकारात्मक परिणाम होतील! title=

मुंबई : तुळशीचे रोप केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे मानले जात नाही, तर वास्तूनुसारही ते विशेष असतं. तुळशीचं रोप कुठेही लावलं तरी ते आजूबाजचा परिसर सकारात्मकतेने भरतो. असं म्हणतात की, ही वनस्पती लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. पण तुळशीचं रोप योग्य दिशेने लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, जर तुम्ही ती चुकीच्या दिशेने लावली तर ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणू शकते.

तुळशीचे रोप चुकीच्या दिशेला लावल्याने ते केवळ सुकतंच असं नाही तर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती देखील खालावते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घरामध्ये तुळशीचे रोप लावण्याची योग्य दिशा कोणती आहे.

तुळशीचं रोप कोणत्या दिशेला असावं

घरामध्ये चुकुनंही तुळशीचं रोप दक्षिण दिशेला लावू नये, असं मानलं जातं. वास्तविक ही दिशा पूर्वजांचं स्थान मानली जाते आणि या दिशेला तुळशीचे रोप लावणे अशुभ मानलं जातं. या दिशेला पितरांसाठी संध्याकाळी चार मुखी तेलाचा दिवा लावावा. 

असंही म्हणतात की, दक्षिण दिशेला तुळशीचं रोप लावल्याने तुम्हाला अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं. या दिशेला तुळशीची लागवड केल्याने लक्ष्मी मातेचा कोप होतो आणि तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. त्यामुळे चुकूनही या दिशेला तुळशीचं रोप लावू नका.

कुठे लावाल तुळशीचं रोप?

वास्तूच्या नियमांनुसार, तुळशीचं रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं. ही दिशा संपत्तीची देवता कुबेर यांच्याशी संबंधित असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या दिशेला तुळशीचं रोप लावणं खूप शुभ असते. ही दिशाही देवी लक्ष्मीशी संबंधित असेल तर तुळशीचं रोप लावण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशा ही सर्वात योग्य दिशा मानली जाते. या दिशेला तुळस असल्यास तुमच्या घरात धन-समृद्धी राहतं शिवाय सकारात्मक ऊर्जा येते.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)