Bedroom Vastu Tips: नवरा-बायकोने रात्री बेडरूममध्ये झोपताना...; वाचा वास्तूशास्त्रात काय सांगितलंय!

चला जाणून घेऊया पती-पत्नीने त्यांच्या बेडरूममध्ये कसं झोपावं, जेणेकरून दोघांमधील नातं चांगलं राहिल.

Updated: Sep 18, 2022, 12:16 PM IST
Bedroom Vastu Tips: नवरा-बायकोने रात्री बेडरूममध्ये झोपताना...; वाचा वास्तूशास्त्रात काय सांगितलंय! title=

मुंबई : तुम्हाला माहिती आहे का की पती-पत्नीमध्ये अनेकदा दुरावा निर्माण होतो. या अंतरासाठी वास्तुदोष देखील कारण असू शकतो. हे तुमच्या बेडरूममध्ये झोपण्याच्या पद्धतीशी देखील संबंधित असू शकतं. जर तुम्ही चुकीच्या दिशेने झोपत असाल तर वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होऊ शकतो. चला जाणून घेऊया पती-पत्नीने त्यांच्या बेडरूममध्ये कसं झोपावं, जेणेकरून दोघांमधील नातं चांगलं राहिल.

वास्तू शास्त्रात, पती-पत्नीसाठी काही नियम सांगितलेत. त्यांचं पालन केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहतं. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यासाठी पत्नीने उजव्या बाजूला बसावं, असं शास्त्रात सांगितलं आहे. तर इतर सांसारिक कामांमध्ये (बसणं, झोपणं, खाणं) पत्नी नेहमी पतीच्या डावीकडे असावी.

वास्तुशास्त्र काय सांगतं

वास्तू म्हणतं की, घराच्या प्रमुखाने उच्च ऊर्जा क्षेत्रामध्ये म्हणजेच दक्षिण दिशेला झोपावं. पलंग अशा प्रकारे ठेवावा की, झोपलेल्या पती-पत्नीचे पाय दक्षिण दिशेला नसावेत. डोकं दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवणं उत्तम मानलं जातं.

दक्षिण दिशेला झोपण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपल्याने पती-पत्नीच्या जीवनात सुख-समृद्धी वाढते, तसेच घरात पैशाची कमतरताही येत नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)