Weekly Horoscope: या दोन राशींना पुढच्या आठवड्यात होणार मोठा धनलाभ

 प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि अडचणींची पूर्व कल्पना आधीच असेल तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं होतं. 

Updated: Nov 21, 2021, 10:12 PM IST
Weekly Horoscope: या दोन राशींना पुढच्या आठवड्यात होणार मोठा धनलाभ  title=

मुंबई: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि अडचणींची पूर्व कल्पना आधीच असेल तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं होतं. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा काही राशीच्या लोकांसाठी खूपच चांगला असणार आहे. 

या काळात त्यांना नोकरीत बढतीही मिळू शकते. 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी खगोल गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा खगोल मित्र चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया. कसा असणार पुढचा आठवडा. 

मेष: सुरुवातीच्या काळात आरोग्याच्या काही समस्या जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घ्या. या आठवड्यात तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

वृषभ: या राशीच्या लोकांना पुढच्या आठवड्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित कामात यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहावे लागेल.

मिथुन: नोकरीच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. अधिकार्‍यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. या आठवड्यात तुमच्या सुखसोयी वाढू शकतात.

कर्क: आत्मसन्मान वाढणार आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. आठवड्याच्या मध्यात तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. 

सिंह: राशीच्या लोकांना खूप चांगले लाभ मिळू शकतात. आठवड्याच्या मध्यात आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

कन्या: वैवाहिक जीवन खूप चांगले राहील. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात काही चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला काही शारीरिक आणि मानसिक तणाव जाणवण्याची शक्यता आहे. 

तुळ: आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल. या आठवड्यात कामाच्या बाबतीत थोडा आळस होऊ शकतो.

वृश्चिक: आईच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरदार वर्गाला या आठवड्यात कामाची भरभराट होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतूनही या आठवड्यात फायदा होऊ शकतो.

धनु: या लोकांना कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळू शकतो. जोडीदारासोबत प्रेम वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती कमजोर असू शकते.

मकर: या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रेमात यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंददायी असेल.

कुंभ: या आठवड्यात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. कामाच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. आपल्यासाठी हा आठवडा फायद्याचा राहणार आहे. 

मीन: पैशाशी संबंधित बाबींमध्ये काही त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप कठीण राहील. नको असलेल्या कामांपासून स्वतःला दूर ठेवा.