Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोग व शुक्र गोचर 'या' राशींसाठी ठरणार लकी, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 13 to 19 may 2024 in Marathi : बुधादित्य राजयोग आणि शुक्र गोचर काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. मे महिन्या तिसरा आठवडा कोणत्या राशीसाठी लकी ठरणा आणि कोणासाठी अडचणीता? टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य 

नेहा चौधरी | Updated: May 12, 2024, 12:55 PM IST
Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोग व शुक्र गोचर 'या' राशींसाठी ठरणार लकी, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य  title=
weekly tarot horoscope prediction tarot card reading for 13 to 19 may 2024 saptahik rashi bhavishya in marathi

Weekly Tarot Horoscope Prediction 13 to 19 may 2024 in Marathi : टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडा बुधादित्य राजयोग आणि शुक्र गोचर काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या आठवड्यात काही राशींना करिअरमध्ये लाभासह अनेक फायदे मिळणार आहे. चला जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचे साप्ताहिक टॅरो कार्ड राशीभविष्य. (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 13 to 19 may 2024 saptahik rashi bhavishya in marathi)

मेष (Aries Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहणार असून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. प्रियजनांच्या संपर्कात असणार आहात. तुमच्यासाठी हा एक लाभदायक आठवडा सिद्ध होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी काही विशेष लाभ किंवा नवीन संधी मिळणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

या आठवड्यात तुम्हाला तुमचे काम पूर्ण करण्यात वेळ लागणार आहे. तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींबाबत संयम बाळगा. सरकारी अधिकाऱ्यांकडून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नशिबावर विसंबून राहण्याऐवजी, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं फायद्याच ठरेल. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित लाभ मिळणार आहे. तुमच्या घरी पाहुणे येणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

या आठवड्यात तुम्हाला काही काळानंतरही उदास वाटणार आहे. तुमची काळजी करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला नकार आणि प्रतिकाराचा सामना करावा लागणार आहे. जीवनाला सामोरे जाताना व्यावहारिक मानसिकता अंगीकारणे तुम्हाला हितकारक ठरेल. आरोग्य आणि पैसा या दोन्ही बाबतीत लाभ मिळणार आहे. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती अपेक्षत आहे तर मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला यश मिळणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

या आठवड्यात तुम्हाला सर्जनशील क्षेत्रात विशेष लाभ होणार आहे. तुमच्या व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्हाला आराम आणि समाधान मिळणार आहे. तुम्ही तुमचा वेळ तुमच्या प्रियजनांसाठी व्यतित करणार आहात. आनंददायी वातावरणात राहाल जे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साहाने नाहून निघणार आहे. प्रेमी आणि विवाहित दोघांसाठी येणारा आठवडा रोमान्सने भरलेला असणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रत्येक स्तरावर अनेक बदल अनुभवण्यास मिळणार आहे. तुम्हाला धीराने आणि घटनांच्या नैसर्गिक प्रवाहात व्यत्यय आणू नका. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या ज्येष्ठांचा सल्ला घेणे महत्त्वाच आहे. पदोन्नतीची संधी असून तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पैशाचा हुशारीने करावा लागणार आहे. तसंच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक प्रवास टाळणे हिताच ठरेल. तुमची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची क्षमता असल्याने तुम्ही करिअरमध्ये प्रगती करणार आहात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल असून, अभ्यासात लक्षकेंद्रित करु शकणार आहात. 

तूळ (Libra Zodiac)  

या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल असणार आहे. तुम्ही तुमच्या बुद्धीने प्रत्येक परिस्थिती सहज हाताळता येणार आहे. घर बदलण्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. मालमत्तेतून लाभाचे संकेत निर्माण झाले आहेत. नात्यांमुळे तुम्हाला मानसिक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. मुलांकडून सकारात्मक बातम्या मिळणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

या राशीच्या लोकांना या आठवड्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम अनुभवास मिळणार आहे. सध्याचा काळ प्रतिकूल असून तुम्हाला मर्यादेत राहवे लागणार आहे. स्वतःला जास्त धोका पत्करणे आणि जोखीम घेणे टाळा. तुम्हाला तुमचे सहकारी आणि मित्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्यात नरम वाटणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac) 

या राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या समस्यांमुळे थोडे चिंतित असणार आहेत. पण, तुमच्या समस्या मित्रांसोबत शेअर केल्याने तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय आल्याने तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना जाणवणार आहे. वैवाहिक जीवनातही काही अडथळे येण्याची शक्यता आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र असणार आहे. तुम्ही विरुद्ध लिंगाच्या सहकाऱ्याकडे आकर्षित होणार आहात. भूतकाळ विसरून वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरणार आहे. नवीन नोकरीच्या संधींमध्ये यश मिळणार आहे. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ असणार आहे. तुमची सध्याची नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ज्यामुळे प्रेमसंबंधांमध्येही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या भूतकाळातील कृतींचा लाभ मिळणार आहे. सध्याचा काळ कामासाठी चांगला असणार आहे. मात्र मैत्रीत आव्हाने असणार आहेत. कामात चांगली कामगिरी करून तुम्ही इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यात यशस्वी होणार आहात. प्रवासासाठी हा उत्तम काळ असणार आहे. सर्वसाधारणपणे, हा एक अनुकूल कालावधी असेल, म्हणून त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि यशस्वी व्हा. 

मीन  (Pisces Zodiac)  

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आनंददायी अनुभूती मिळणार आहे. तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. सध्या कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)