Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योग आणि रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 15 to 21 april 2024 in Marathi : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासोबत ग्रह गोचरसंदर्भात पाहिलं तर या आठवड्यात बुध, शुक्र आणि राहूमुळे त्रिग्रही योग असणार आहे. रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Apr 14, 2024, 09:49 AM IST
Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योग आणि रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य title=
weekly tarot horoscope prediction tarot card reading for 15 to 21 april 2024 saptahik rashi bhavishya in marathi

Weekly Tarot Horoscope Prediction 15 to 21 april 2024 in Marathi : राजकारणासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तरदुसरीकडे हा आठवडा रामभक्तांसाठी खास आहे. रामनवमीचा हा आठवडा टॅरो कार्डच्या गणितानुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून

मेष (Aries Zodiac)  

टॅरो कार्ड्सनुसार हा आठवडा या लोकांसाठी जरा कठीण असणार आहे. तुमच्या समस्यांमधून मुक्ती मिळवण्यासाठी इतरांच्या सल्ल्याची मदत लागणार आहे. धार्मिक आणि अध्यात्मात रुची वाढणार आहे. भाऊ, बहीण, नातेवाईक यांच्याशी विचारांच्या समन्वयाचा अभाव दिसणार आहे. सहकाऱ्यांशीही संबंधात दुरावा येण्याची शक्यता आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला सिद्ध होणार आहे. या आठवड्यात व्यवसायात नवीन योजना अंमलात आणणार आहेत. प्रेमप्रकरणातही यश मिळणार आहे. हा आठवडा मनोरंजनाने भरलेला असणार आहे. कामासाठी वेळ समाधानकारक असणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

टॅरो कार्डच्या गणितानुसार या राशीच्या लोकांना हा आठवड्यात कोणीतरी फसवू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे सावध राहणे गरजेचे आहे. तसंच, मित्रांना भेटताना थोडी काळजी घ्या. या आठवड्यात जर कोणी तुमच्याकडे पैसे उधार मागितल्यास देऊ नका. दीर्घकाळ चाललेले प्रेमसंबंध लग्नापर्यंत जाणार आहे. आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

टॅरो कार्ड्सनुसार हा आठवडा या राशीच्या लोकांच्या मनात काही गोंधळ निर्माण करणारा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही नातेसंबंध, संधी आणि विरोध यात अडकणार आहात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात जाऊ नका.  त्यामुळे विनाकारण गोंधळ होईल. जुना वाद या आठवड्यात मिटणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांना हा आठवड्यात आनंदाची बातमी घेऊन आला आहे, असं टॅरो कार्ड्सचे गणित भाकीत करत आहेत. तुमचं प्रमोशन होऊ शकतं. सहकाऱ्यांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटणार आहे. ते तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. या काळात काही सावधगिरीने काम करणे तुमच्या हिताचे होईल. स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे. साहित्य-संगीताची आवड वाढणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या आरोग्याबाबत ठीक नसणार आहे. या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसोटीचा असणार आहे. तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. कामात अडथळे येणार आहे. चांगली नोकरीची संधी मिळणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  

टॅरो कार्ड्स गणनेनुसार तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सौम्य आणि ज्ञानाने परिपूर्ण ठरणार आहे. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देणे तुमच्यासाठी फायद्याच ठरेल. व्यवसायात नवीन यश आणि प्रगती लाभणार आहे. प्रेमसंबंध मधुरता आणि विश्वास वाढणार आहे. तुम्हाला एक छान भेट वस्तू मिळणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

या राशीच्या लोकांना हा आठवडा मानसिक गोंधळापासून मुक्ततेचा असणार आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सहकाऱ्यांशी समन्वय राखवून ठेवणे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. काही क्षेत्रांमध्ये तुमची निराशा होणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac) 

टॅरो कार्डनुसार या राशीचे लोक या आठवड्यात खूप आनंदी असणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला प्रेम व्यक्त करण्यात घाई न करण्याचा सल्ला आहे. तुम्ही ज्या भावनांना प्रेम समजता त्या केवळ आकर्षण ठरू शकतं. आर्थिक स्थिती समाधानकारक असणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac) 

मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात जवळजवळ प्रत्येक स्तरावर समायोजन करणे गरजेचे ठरणार आहे. या काळात तुम्हाला खूप संयम बाळगण्याची गरज असणार आहे. पदोन्नतीच्या संधीही मिळणार आहे. या काळात तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तुमच्या बाजूने वापरण्यास सक्षम ठरणार आहात. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांच्या स्वभावात आक्रमक असणार आहे. तुम्हाला या आठवड्यात थोडे उदास वाटणार आहे. त्यामुळे कशातही तुमच मन लागणार नाही. अनावश्यक खर्च करु नका. जोडीदारासोबत मतभेद होणार आहेत. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक ठेवल्यास तुम्हाला फायदा होईल. 

मीन  (Pisces Zodiac) 

टॅरो कार्डनुसार या राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाशी संबंधित नवीन योजना कार्यान्वित होणार आहे. प्रेमप्रकरणातही यश मिळणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी मनोरंजनाने भरलेला असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)