Yogini Ekadashi 2023 : 14 जूनपासून 'या' राशींचं भाग्य उजळणार; पैशांचा पडणार पाऊस

Yogini Ekadashi 2023: योगिनी एकादशी 13 जून रोजी सकाळी 9:28 वाजता सुरू होणार असून आणि दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी सकाळी 8:28 वाजता संपणार आहे. ही योगिनी एकादशी काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Updated: Jun 12, 2023, 09:54 PM IST
Yogini Ekadashi 2023 : 14 जूनपासून 'या' राशींचं भाग्य उजळणार; पैशांचा पडणार पाऊस title=

Yogini Ekadashi 2023: हिंदू कॅलेंडरप्रमाणे, योगिनी एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरीची पूजा केल्याने पाप कर्मांपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. 

यंदा योगिनी एकादशीची तारीख 13 जून की 14 जून याबद्दल काहीसा गोंधळ आहे. मात्र योगिनी एकादशी 13 जून रोजी सकाळी 9:28 वाजता सुरू होणार असून आणि दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी सकाळी 8:28 वाजता संपणार आहे. 14 जून रोजी उदय तिथी असल्याने ही एकादशी 14 जून रोजी साजरी केली जाणार आहे.

दरम्यान ही योगिनी एकादशी काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

या राशीच्या व्यक्तींवर योगिनी एकादशीचा सकारात्मक प्रभाव पडेल. जीवनात अनेक क्षेत्रांमध्ये या राशींना यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी व्यावसायिक आणि व्यावसायिकांचीही भरभराट होण्याीची शक्यता आहे.  या काळामध्ये तुमच्या घरात शांतता नांदणार आहे. कुटुंबामध्ये सुख-समृद्धी असेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अधिक शुभ असणार आहे.

सिंह रास

या राशीच्या लोकांना या एकादशीचा फायदा होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये काही योजना असतील तर हा काळ चांगला असणार आहे. अपूर्ण काम पूर्ण करण्यामधये तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. करिअरमध्ये यश मिळण्याची अधिक शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गोडवा येणार आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास अच्छे दिन लवकरच येणार आहेत. 

कन्या रास

व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक राहणार आहे. नुकत्याच केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदणार आहे. जोडीदाराशी असलेले संबंध सुधारणार आहेत. याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आध्यात्मिक कार्यात चांगला वेळ जाणार आहे. वैयक्तिक कामं शांततेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )